नागपूर : जन्मदात्या पित्यानेच घोटला पोटच्या पोराचा गळा
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जन्मदात्या पित्यानेच पोटच्या पोराची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानं राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर चांगलंच हादरलंय. नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुरादेवी झोपडपट्टीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.
गुलशन उर्फ गोलू असं १० वर्षांच्या मृत मुलाचं नाव आहे. गोलूच्या वडिलांनी कुत्र्यांच्या गळ्यातील पट्ट्याने गळा आवळून त्याचा खुन केला असून याप्रकरणी पोलिसांनी नराधम बाप संतलाल मडावीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, दारुच्या नशेत असलेल्या संतलालनं आपल्या मुलाला पाणी भरण्यास सांगितले होते. मुलाने पाणी भरले नाही, म्हणून संतापलेल्या बापाने गंभीर मारहाण केली आणी त्यानंर त्याने पट्ट्याने गळा आवळून खुन केल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाणीनंतर बेशुद्ध असलेल्या मुलाला एका नातेवाईकाने पाहिल्यानंतर स्थानिकांच्या व पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. छोट्या छोट्या कारणावरुन नशेत असलेल्या बाप आपल्या मुलाचा सतत मारहाण करत असल्याचे आरोप स्थानिकांनी केल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?

