

जगभरात सर्वात जास्त वापरकर्ते असलेली सोशल नेटवर्क असलेल्या फेसबूक (Facebook) कंपनी आपले नाव बदल्याच्या तयारीत आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबत पुढील आठवड्यात चर्चा होणार आहे. जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने नाव बदलण्याचा मार्क झुकेरबर्ग यांच्या विचार सुरू आहे. याबाबतचे वृत्त द व्हर्ज यांनी आज (दि.२०) मंगळवारी दिले आहे.
पुढील आठवड्यात फेसबूक कंपनीची वार्षिक सभा होणार आहे. या बैठकीत फेसबुक संस्थापक सीईओ मार्क झुकेरबर्ग याबाबत फेसबूकची नवीन माहिती सादर करणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्हर्जच्या वृत्तानुसार बोलले जात आहे.
आभासी जगात राहणाऱ्याला याबाबत जास्त प्राधान्य देण्याची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा आभासी जगात वावरत असतात त्याला मेटाव्हर्स असे बोलले जाते.
काही दिवसांपूर्वी, फेसबुकने मेटावर्स तयार करण्यासाठी पुढील पाच वर्षांत युरोपियन युनियनमध्ये 10,000 अभियंत्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली.
मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे इन्स्टाग्राम, व्हॉट्सअपची सुद्धा मालकी आहे.