व्यायामातही लागू हाेताे ‘मार्जिनल युटीलिटी’चा सिद्धांत, जाणून घ्‍या सविस्‍तर

व्यायामातही लागू हाेताे ‘मार्जिनल युटीलिटी’चा सिद्धांत, जाणून घ्‍या सविस्‍तर
Published on
Updated on

व्यायाम करण्याची एक मजा असते. त्यामुळे शरीर हलकं तर होतंच पण मनही प्रसन्न राहतं. यामुळेच जमेल तसा व्यायाम हा करायला हवा. हे सगळ्यांना पटतं खरं,पण प्रत्यक्षात त्यातलं किती उतरतं हे मात्र माहीत नाही. ( Exercise formula )

आठवड्यात पाच ते सहा दिवस सातत्याने व्यायाम केला तर त्याची फळं कायमस्वरूपी दिसतील. व्यायामाची सुरुवात करणारे बरेच जण पहायला मिळतात. जोमाने जिम लावतात, डाएट करतात, त्याचे परिणाम दिसायला लागले की सुखावतात आणि नंतर व्यायामावरून लक्ष काढून घेतात. व्यायाम सोडण्यामागे कारणे अनेक असतात. सुरुवातीला दिसलेले परिणाम नंतर कमी होऊ लागतात; मग त्यातली मजा जाते. एकाच प्रकारचा व्यायाम करण्याचा कंटाळा येतो किंवा त्याच व्यायाम प्रकाराने शरीरात काही बदल होताना दिसत नाही. त्यामुळे मार्जिनल युटीलिटीचा सिद्धांत इथेही लागू होतो. त्यासाठीच वेगवेगळे प्रकार आजमावत राहणे हा त्याला एक चांगला पर्याय आहे.

Exercise formula : व्यायाम प्रकारात भिन्नता आणणे बदलाचा एक चांगला मार्ग

व्यायाम प्रकारात भिन्नता आणणे हा बदलाचा एक चांगला मार्ग आहे. व्यायामाचे अनेक प्रकार असतात. त्यातला कोणता तुमच्या शरीराला आणि राहणीमानाला योग्य ठरतोय हे आधी शोधलं पाहिजे. शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामांची गरज असते. नुसता फिटनेस राखायचा आहे की वजन कमी करायचं आहे किंवा बॉडी बिल्डिंग करायचं आहे. यावर कोणता प्रकारचा व्यायाम करायचा ते ठरवावं लागतं. काहीवेळा शरीराला गरज नसलेले व्यायामप्रकार करून नुकसान होण्याचीही गरज असते. त्यामुळे एखादा विशिष्ट प्रकार जर सुरू करायचा असेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना विचारलेलं बरं.

जॉगिंग सोपा व्यायामप्रकार

काहीवेळा नुसता फिटनेस राखण्यासाठी व्यायाम केला जातो. अशावेळी काही व्यायाम प्रकार डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही. जॉगिंग हा प्रकार सगळ्यात सोपा आणि कुठेही करता येण्यासारखा व्यायामप्रकार आहे. त्यासाठी फारशी साधनं लागत नाहीत. जॉगिंगमुळे हृदयाची गती वाढून रक्ताभिसरण वाढायला मदत होते. त्यामुळे फुफुस्सांची क्रियाही सुधारते. त्यामुळे फिटनेस वाढवण्यासाठी हा एक चांगला पर्याय समजला जातो. सकाळची वेळ त्यासाठी उत्तम आहे. कोणत्याही जॉगिंग पार्कमध्ये त्यासाठी जाता येईल. रस्त्यावरही जॉगिंग करता येईल. त्याआधी थोडं वॉर्मअप मात्र करायला हवं.

ब्रिस्क वॉकिंग

ब्रिस्क वॉकिंग हाही एक चांगला व्यायाम आहे. यात शरीराची हालचाल चांगली होते. भराभर चालणं याला ब्रिस्क वॉकिंग म्हणतात. साधारण रोज ४५ मिनिटे असे चालल्याने चांगला व्यायाम होतो. हा व्यायामप्रकार एकट्याने किंवा दोन-तीन जणांनी मिळून करण्यासारखा आहे; मात्र त्यामुळे बोलण्याचा स्पीड वाढून चालण्याचा स्पीड कमी होत असेल तर मात्र उपयोग होणार नाही.

पोह‍णे सर्वांगीण व्यायाम

पोहण्याचा व्यायामही सर्वांगीण व्यायामात मोडतो. त्यामुळे स्नायू तर बळकट होतातच पण फुफ्फुसांची ताकदही वाढते. त्याचा फिटनेस टिकवायला चांगला फायदा होतो. दिवसातून एक तास पोहण्याचा व्यायाम केला तर वजन कायम राखायलाही मदत होते.

टेकडी चढण्याचा व्यायाम हा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जाणारा आणखी एक लोकप्रिय व्यायामप्रकार आहे. ज्यांनी वजन कमी करण्यासाठी जिमचे व्यायामप्रकार केले असतील आणि नंतर वजन एकाच पातळीवर ठेवण्यासाठी एखादा व्यायाम करायचा असेल त्यांनी हा प्रकार करायला हरकत नाही. मात्र पाठदुखी किंवा गुडघेदुखी असणार्‍यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा व्यायाम करावा.

सायकलिंग हा प्रकारही अनेकांना फिटनेससाठी चांगला वाटतो. ट्रॅफिक आणि प्रदूषण टाळायचे असेल तरी हा व्यायाम प्रकार जास्तीत जास्त जणांनी अवलंबायला हरकत नाही.

क्रंचेस किंवा सीटअप्स हाही घरच्या घरी करता येण्यासारखा आणि कोणतीही व्यायामाची उपकरणं न वापरता करता येणारा व्यायाम प्रकार आहे. फ्लोअर एक्सरसाईज हा देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि स्नायू बळकट करण्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो. प्रकार कोणताही निवडला तरी त्यात सातत्य राखून त्याचे फायदे मिळवणंही गरजेचं आहे.

Exercise formula : फिटनेससाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्‍यक

फिटनेस हा कोणत्याही औधषाच्या गोळीने येणारा प्रकार नाही तर त्यासाठी सतत प्रयत्न करत राहायला हवा. खेळाडूंना ज्याप्रमाणे प्रत्येक सिझनसाठी आपला फिटनेस चांगला ठेवावा लागतो तसाच तो व्यायाम करून शरीर कमावणार्‍यांना किंवा वजन उतरवणार्‍या माणसांनाही सांभाळावा लागतो. कोणताही व्यायाम प्रकार निवडलात तरी त्याचे फायदे दिसायला काही वेळ जातो. हा वेळ दोन-तीन महिन्यांपासून ते कधी कधी वर्षभरापर्यंतही असू शकतो. त्यामुळे लगेच परिणाम दिसले नाहीत तर निराश होता कामा नये. व्यायाम प्रकार सुरू केला आणि नंतर त्यातला रस कमी झाला तरी तो एकदम बंद करू नये. त्याला जोडीला दुसरा व्यायाम सुरू ठेवावा.

डॉ. संतोष काळे

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news