

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली येथील प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आणि मानद वन संरक्षक अजित उर्फ पापा पाटील यांचे आज (दि.३) निधन झाले. त्यांच्या निधनाने पर्यावरण आणि निसर्ग प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.
नुकत्याच झालेल्या राज्य पक्षी संमेलनाचे अजित पाटील यांनी अध्यक्ष पद भूषवले होते. या संमेलनामध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. अजित पाटील यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या होत्या. कृष्णा आणि इंद्रावती मोहिमेतही ते सहभागी होते. बाबा आमटे यांचे 'आनंदवन', प्रकाश आमटे यांचे 'हेमलकसा' या प्रकल्पाशी ते जोडले गेले होते. सांगली जिल्ह्यातील चांदोली व्याघ्र प्रकल्पसाठी अजित पाटील यांचे मोठे योगदान होते. तसेच शिराळा येथील जिवंत नागाची पूजा बंद करण्यामध्ये देखील त्यांचे योगदान आहे.
हेही वाचा :