

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानविरूद्ध सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सर्वबाद २८४ धावा केल्या आहेत. यामध्ये सलामीवीर गुरबाजने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. तर इक्रामने ५८ धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये इंग्लंडच्या आदिल राशिदने सर्वाधिक ३ विकेट घेतले. त्याच्यासह मार्क वूडने २ तर जो रूट, लिव्हिंगस्टोन आणि टोप्लेने प्रत्येकी १ विकेट घेतली. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात विजय मिळण्यासाठी इंग्लंडला २८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (ENG vs AFG)
अफगाणिस्तानची फलंदाजी :
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने दमदार सुरूवात करत ७ ओव्हरमध्ये ५१ धावा केल्या. यामध्ये गुरबाजने २० बॉलमध्ये २९ धावांची खेळी केली. तर इब्राहिम झद्रानने २४ बॉलमध्ये १७ धावांची खेळी केली. यासह दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. (ENG vs AFG)
इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज गुरबाज दमदार खेळी करत आपले अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत ४७ बॉलमध्ये ६८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ७ चौकार आणि ४ षटकार लगावले. यासह अफगाणिस्तानने बिनबाद १०० धावांचा टप्पा पार केल्या आहेत. गुरबाज आणि इब्राहिम यांनी शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली.
अफगाणिस्तानची पहिली विकेट ११४ धावांवर पडली. इब्राहिम झद्रान ४८ बॉलमध्ये २८ धावा करून बाद झाला. आदिल रशीदने त्याला जो रुटकरवी झेलबाद केले.
सामन्याच्या १९ व्या ओव्हरमध्ये आदिल राशिदच्या गोलंदाजीवर विकेटकीपर बटलरने अफगाणिस्तानच्या रहमत शाहला स्टंप आऊट केले. याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अफगाणिस्तानला मोठा झटका बसला. धाव घेताना आक्रमक फलंदाजी करणरा गुरबाज रन आऊट झाला. त्याने आपल्या खेळीत ५७ बॉलमध्ये ८० धावांची खेळी केली.
अफगाणिस्तानची चौथी विकेट १५२ धावांवर पडली. अजमतुल्ला ओमपरझाई २४ मध्ये १९ धावा करून बाद झाला. लिव्हिंगस्टोनने त्याला ख्रिस वोक्सकरवी झेलबाद केले.
अफगाणिस्तानचा निम्मा संघ १७४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. जो रूटने शाहिदीला बाद करून अफगाणिस्तानला पाचवा धक्का दिला.
सामन्याच्या ३७ व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला सहावा धक्का बसला. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूडने मोहम्मद नबीला जो रूट करवी झेलबाद केले. नबीने आपल्या खेळीत १५ बॉलमध्ये ९ धावांची खेळी केली.
सामन्याच्या १५ व्या ओव्हरमध्ये राशिद खानच्या रूपात अफगाणिस्तानला सातवा धक्का बसला. त्याला आदिल राशिद खानने जो रूट करवी झेलबाद केले. राशिदने आपल्या खेळीत २२ बॉलमध्ये २३ धावांची खेळी केली.
सामन्याच्या ४७ व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला मोठा झटका बसला. सामन्यात आक्रमक खेळी करणारा इक्राम बाद झाला. त्याला इंग्लंडचा गोलंदाज टोप्लेने सॅम करण करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत ६६ बॉलमध्ये ५८ धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले. यानंतर ४९ व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रहमानच्या रूपात अफगाणिस्तानला नववा धक्का बसला. त्याला मार्क वूडने रूट करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत १६ बॉलमध्ये २८ धावांची खेळी केली. (ENG vs AFG)
सामन्याच्या ५० व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर नवीन उल हकला विकेटकीपर बटलरने रन आऊट करत अफगाणिस्तानचा डाव २८४ धावांवर गुंडाळला. नवीनने आपल्या खेळीत ५ धावा केल्या.
हेही वाचा :