इलेक्शन इफेक्ट : कच्चे तेल भडकले, तरीही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे : 'इलेक्शन सबकुछ करवाता है, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही', असे म्हणतात. पण, सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी शहाजोगपणा ठेवावा लागतो, हेही तितकेच खरे. आता हेच बघा ना, म सलग पाच आठवड्यांपासून या दरात वाढ होत असून, ऑक्टोबर 2014 नंतर प्रथमच अशा प्रकारे कच्च्या तेलाचे भाव विक्रमी भडकले आहेत. मात्र, अशातही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याने, पाच राज्यांतील निवडणुकांनी भाववाढ रोखल्याचा प्रत्यय सध्या भारतीय जनतेला येत आहे.

भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती निश्चित करण्याचे सर्वाधिकार पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांना दिले आहेत. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढूनदेखील तेल कंपन्या देशांतर्गत दरात कसलीच वाढ करताना दिसत नाहीत. त्याचे एकमेव कारण म्हणजे पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होय. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आठ वर्षांपूर्वी असलेले सर्वाधिक दर सध्या प्रतिबॅरल मोजावे लागत आहेत. मात्र, अशातही गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमतींनी 2014 नंतर प्रथमच प्रतिबॅरल 87 डॉलर्स ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. जागतिक पातळीवरील वाढता भू-राजकीय तणाव आणि पुरवठ्यातील अडथळे यामुळे कच्च्या तेलात दरवाढ होत आहे.

निवडणुका आल्या की, दर स्थिर
यापूर्वी 2017 मध्ये पंजाब, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये 16 जानेवारी ते 1 एप्रिल 2017 दरम्यान निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. तेव्हादेखील इंधनाच्या किमती स्थिर ठेवल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर डिसेंबर 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास दोन आठवडे वाढल्या नव्हत्या. 2019 मध्ये एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीतही तेल कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र, मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडताच, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ केली गेली.

दिवाळीपासून देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. सध्या देशात पेट्रोल सरासरी 110 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 98 रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती ज्या वेगाने वाढत आहेत, त्यावरून इलेक्शन संपताच इंधन दरात भडका होण्याची शक्यता आहे. पण, काहीही असो, निवडणुकांमुळे का होईना, देशातील जनतेला इंधनाच्या माध्यमातून काही प्रमाणात दिलासा मिळाला, हे नक्की.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news