

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 'ईडी'ने (सक्तवसुली संचनालय) नोटीस बजावली आहे. शिवाय २ नोव्हेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या नवीन मद्य धोरणाबाबत ईडी केजरीवाल यांची चौकशी करणार आहे.
यापूर्वी १६ एप्रिल रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने कथित अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची नऊ तास चौकशी केली होती. या प्रकरणी तपास यंत्रणेने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक केली आहे.