

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र एचएससी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान एक नाही तर तीन पेपर लीक झाल्याचे उघड झाले आहे. गणिताच्या पेपरफुटीच्या चौकशीदरम्यान भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचेही पेपर फुटल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी अहमदनगर येथील मातोश्री भागुबाई भांबरे कृषी आणि विज्ञान ज्युनियर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा :