

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुबई मधील डेरा येथील दुबईतील एका निवासी इमारतीला भीषण आगी लागली. यात १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या १६ जणांपैकी चार भारतीयांचा समावेश आहे. ४ पैकी केरळमधील एका दाम्पत्याचा समावेश आहे तर. दोघेजण हे तामिळनाडूमधील आहे. ही भीषण आग शनिवारी दुपारी १२.३५ वाजता सुमारास लागली. स्थानिक वेळेनुसार दुपारी २:४२ पर्यंत आग आटोक्यात आणली. (Dubai)
Dubai : इतर मृत पाकिस्तान आणि सुदानमधील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील एका जोडप्यासह चार भारतीयांची ओळख पटली आहे. कलंगदन रिजेश (वय ३८ वर्षे) आणि कंदमंगलत जिशी (वय ३२ वर्षे) अशी केरळमधील मृत दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही मलप्पुरममधील वेंगारा येथील रहिवासी आहेत. तर इमारतीत काम करणारे तामिळनाडूचे दोन पुरुष आहेत. याशिवाय ३ पाकिस्तानी चुलत भाऊ आणि एका नायजेरियन महिलेचा यांचा समावेश आहे.
बचाव कार्यात सहभागी झालेल्या सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या इमारतीला आग लागली होती तो परिसर वर्दळीच्या बाजारपेठ असलेला भाग आहे. आगीत मृत्यू झालेल्या केरळमधील दाम्पत्यामधील कंदमंगलत जिशी हा खिजाईस क्रिसेंट स्कूलमध्ये शिक्षक होता. रिजेशच्या वडिलांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार रिजेश आणि जिशी या दोघांचेही मृतदेह उद्यापर्यंत त्यांच्या मूळ गावी पोहोचेल.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत करत असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा