धक्कादायक ! पोटच्या मुलानेच केला घात; दारुड्या बापाचा केला खून

धक्कादायक ! पोटच्या मुलानेच केला घात; दारुड्या बापाचा केला खून
Published on
Updated on

पौड(ता. मुळशी ); पुढारी वृत्तसेवा : कुंभेरी येथे मुलानेच आपल्या वडिलांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून मारहाण करून खून केला. पोलिस पाटील वसंत लक्ष्मण दळवी यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीप्रमाणे मयत संभाजी शिंदे (वय 58, रा. कुंभेरी) याला त्याचाच मुलगा संजयने शनिवारी ( दि.6) रात्री 10 च्या सुमारास कुंभेरी येथील घरात दगड, लाथा-बुक्क्याने मारहाण केली.

यात वडील संभाजी शिंदे यांचा मृत्यू झाला. संभाजी हा रोज दारू पिऊन आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याचा राग मनात धरून संजयने हे कृत्य केले. पौड पोलिसांनी रविवारी ( दि.7) सकाळी आरोपी संजयला अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news