Drunk Girls Beat Up One Girl In Indore : इंदोरमध्ये मद्यपी तरुणींचा धिंगाणा; चौघींकडून एकीस बेदम मारहाण (VIDEO)

Drunk Girls Beat Up One Girl In Indore : इंदोरमध्ये मद्यपी तरुणींचा धिंगाणा; चौघींकडून एकीस बेदम मारहाण (VIDEO)
Published on
Updated on

इंदोर; पुढारी ऑनलाईन : दारुची नशा काय काय करवीते हे आपणास माहित आहे. दारु नशेत पुरुष मद्यपी काय काय करामती करतात हे आपण नेहमीच पहातो. पण, त्याच दारुच्या नशेत महिलासुद्धा तशाच प्रकराचा धिंगाणा घालतात. या बाबतचा इंदोर येथील एक व्हिडिओ सध्या जोरदारपणे व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दारु नशेत असणाऱ्या चार तरुणी एका तरुणीस बेदम मारहाण करत असताना दिसत आहेत. सध्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु असून इंदोरमध्ये धिंगाणा घालाणाऱ्या तरुणीचा शोध पोलिस प्रशासनाकडून सुरु असल्याचे सांगितले जाते. (Drunk Girls Beat Up One Girl In Indore)

मध्यप्रदेश मधील मायावीनगरी समजल्या जाणाऱ्या इंदोरमध्ये दोन ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चार मद्यपी तरुणींनी एका तरुणीस बेदम मारहाण केली. चार मुलींनी एका मुलीला रस्त्यात घेरले आणि नंतर तिला मारहाण केली. त्यानंतर एक मुलगी रस्त्यावर पडलेल्या मुलीच्या अंगावर बसते आणि तिला बेदम मारहाण करते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी सांगितले की, प्राथमिक तपासात हे प्रकरण एमआयजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलींचा शोध घेतला जात आहे. (Drunk Girls Beat Up One Girl In Indore)

चार तरुणी एका तरुणीस बेदम मारहाण करत आहेत. तसेच एक जण पीडित तरुणीचा मोबाईल तोडतोना व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे. पण, यावेळी हा सर्व प्रकार अनेकजण पहात असल्याचे सुद्धा दिसत आहे. पण, यावेळी कोणीही पुढे येत या मुलींना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट अनेकजणांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद करुन घेण्यात धन्यता मानली. (Drunk Girls Beat Up One Girl In Indore)

दोन महिन्यांपूर्वी इंदूरच्या बीआरटीएस कॉरिडॉरच्या बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पोलिसांची गस्त कमी असते. याच ठिकाणी चार मुली एका मुलीला मारहाण करताना दिसत आहेत.

या ठिकाणी राहणाऱ्या अक्षांश मेहरा यांनी सांगितले की, बीआरटीएस मार्केट चोवीस तास सुरू असल्याने अशा घटना वारंवार समोर येत आहेत. येथे पोलिस बंदोबस्त नाही. हा चौक बीआरटीएसच्या व्यस्त चौकांपैकी एक आहे. जेव्हा अशी घटना इथे घडू शकते, तेव्हा या ठिकाणी गंभीर घटना सुद्धा घडू शकते. मद्यधुंद तरुण – तरुणी २४ तास सुरू असलेल्या रेस्टॉरंटमध्ये येतात आणि आपापसात वाद घालतात. या चौकाचौकात दिवसा पोलीस वाहनांवर कारवाई करताना दिसतात, मात्र रात्री दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या मुला-मुलींवर कारवाई होत नाही.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news