Actor Zara Phythian : ‘डॉक्टर स्ट्रेंज’ फेम झारा फिथियानला बाल लैंगिक शोषण प्रकरणी ८ वर्षांची शिक्षा

Actor Zara Phythian : ‘डॉक्टर स्ट्रेंज’ फेम झारा फिथियानला बाल लैंगिक शोषण प्रकरणी ८ वर्षांची शिक्षा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलिवूड जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट 'डॉक्टर स्ट्रेंज' (Doctor Strange) फेम अभिनेत्री झारा फिथियान (Actor Zara Phythian) हिला बाललैंगिक प्रकरणी न्यायालयाने ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी, नॉटिंगहॅम क्राउन कोर्टात अभिनेत्री झारा फिथियान हिला शिक्षा सुनावण्यात आली. झारा फिथियन १३ ते १५ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. बाल लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण २००५ आणि २००८ मधील आहे. या बातमीने संपूर्ण हॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

यासोबतच न्यायालयाने झारा फिथियानचा (Actor Zara Phythian) पती व्हिक्टर मार्का (Victor Marke) यालाही दोषी ठरवले आहे. ५९ वर्षीय व्हिक्टरला पीडितेवर अत्याचार आणि दुसऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेनंतर आता पती-पत्नी दोघेही लैंगिक गुन्हेगारांच्या रजिस्टरवर स्वाक्षरी करतील. यासोबतच त्यांना यापुढे मुलांसोबत काम करण्याची परवानगी मिळणार नाही.

अस्वस्थ झारा (Actor Zara Phythian)

सोमवारी या जोडप्याला शिक्षेसाठी कोर्टरूममध्ये एकत्र हजर करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, झाराचा पती मार्का पब्लिक गॅलरीत लोकांना पाहून रडला तर खुर्चीत बसेलेली अभिनेत्री झारा खुपच अस्वस्थ दिसत होती

कोर्ट म्हणाले- तुमचे कृत्य नियोजन बद्ध (Actor Zara Phythian)

शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती मार्क वॉटसन यांनी जोडप्याला सांगितले की, पीडित मुलीचे लैंगिक शोषण पूर्ण नियोजन बद्ध रित्या करण्यात आले होते. कोर्टाने अभिनेत्रीचा पती मारकाला सुनावले, 'आमचा विश्वास आहे की या शोषणामागील व्यक्ती तूच होतास, ज्याने भडकवण्याचे काम केले.' मात्र, झारा आणि तिचा पती मार्काने आपल्यावरील लैंगिक शोषणाचे १४ आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र न्यायालयाने ते दोषी असल्याचे सांगितले.

झारा फिथियान आणि तिचा पती व्हिक्टर मार्का
झारा फिथियान आणि तिचा पती व्हिक्टर मार्का

'डॉक्टर स्ट्रेंज' चित्रपटामुळे आली प्रसिद्ध झोतात (Actor Zara Phythian)

गेल्या आठवड्यात झाराचा ३७ वाढदिवस होता . यापूर्वी ज्या दिवशी या दाम्पत्याला न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्या दिवशी शिक्षा सुनावण्यात आली नव्हती. नॉटिंगहॅममध्ये जन्मलेल्या झारा फिथियनला मार्वलच्या 'डॉक्टर स्ट्रेंज' मधील ब्रुनेट झिलॉटच्या भूमिकेसाठी जगभरात लोकप्रियता मिळाली. पण, तिने या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळण्याआधी हे कृत्य केले होते.

पीडितेचे म्हणणे ऐकून न्यायालय हादरले

दुसरीकडे, या प्रकरणातील पीडित मुलीने पोलिस चौकशीत सांगितले की, 'मला वाटते की त्यांनी माझ्याकडे भेदभावाने पाहिले आणि माझ्यावर अत्याचार केला. जे घडले ते त्याचे सर्वात मोठे रहस्य होते. पीडितेने सांगितले की, व्हिक्टर मार्काने तिच्यासोबत अनेकदा गैरवर्तन केले. एकदा चुकून पीडितेच्या पायाला मार्काचा हात लागला तेव्हा ती त्याची शिकार ठरली.
पीडितेने कोर्टात सांगितले की, त्यांनी माझे बालपण हिरावून घेतले. मला दुषीत केले. त्यांनी मला धमकावले पण, मी निर्णय घेतला की गप्प पुतळ्याप्रमाणे न बसता यांना धडा शिकवायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news