Diabetes Signs On Skin : त्वचेचे हे आजार असतील तर मधुमेह असू शकतो!

Diabetes Signs On Skin : त्वचेचे हे आजार असतील तर मधुमेह असू शकतो!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diabetes Signs On Skin : फास्टफूड, रेडिमेड फूड, प्रोसेस्ड फूड त्याच बरोबर कामाचा अतिरिक्त ताण, अपुरी झोप, जेवणामध्ये सिंथेटिक गोष्टींचा वापर, अनुवांशिकता अशा अनेक कारणांमुळे डायबिटीजच्या रुग्णांचे प्रमाण वाढत होते. रक्तातील साखरचे संतुलन बिघडणे हे डायबिटीजचे प्रमुख लक्षण आहे. डायबिटीज हा एक क्रोनिक आजार आहे, जो आयुष्यभर राहतो. मधुमेह झाल्यानंतर सतत लघवी होणे, खूप जास्त भूक लागणे, तहान लागणे, वजन कमी होणे, हात-पाय सुन्न होने अशी काही लक्षणे आढळतात.

मात्र नवीन झालेल्या संशोधनानुसार, मधुमेहाची सुरुवात किंवा मधुमेह होणार असेल तर त्वचेवर त्याची प्राथमिक लक्षणे आढळतात, असे हेल्थ एक्सपर्ट्सनी सांगितले आहे. Diabetes Signs On Skin :

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते , जर तुमच्या त्वचेवर पुढील प्रकारची लक्षणे आढळत असतील तर त्याकडे दूर्लक्ष करू नये कारण हे मधुमेहाचे संकेत असू शकतात. तुम्ही लवकरच डॉक्टर्सशी संपर्क करून मधुमेहासाठी आवश्यक चाचणी करून घ्यावी.

Diabetes Signs On Skin

सुजलेली किंवा लाल त्वचा : बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे त्वचेत जळजळ होणे, त्वचा खूप लवकर गरम होणे, त्वचेवर सूज येणे, त्वचा लाल पडणे अशी लक्षणे आढळून येतात. याशिवाय खूप त्रासदायक देखिल असते. स्टैफ इन्फेक्शन हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये सामान्य आहे.

Diabetes Signs On Skin : पुरळ आणि फोड : हे फंगल इन्फेक्शनच्या कारणाने होते. कैंडिडा एल्बीकैंसच्या कारणाने होणा-या यीस्ट सारखा फंगल इन्फेक्शन मधुमेहाच्या रुग्णांना खूप लवकर प्रभावित करतो. हे खूप सामान्य फंगल इन्फेक्शन आहे. या फंगसमुळे चकते पडून पूरळ आणि फोड उठतात. यामध्ये बोटांच्यामध्ये होणारे फंगल इन्फेक्शन, वजाइनल इन्फेक्शन, खाज आणि दाद यांचा समावेश आहे.

खाज सुटणे – सर्वांगाला किंवा विशेष करून पायाच्या खालच्या भागात वारंवार खाज सुटणे हे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दिसणा-या प्राथमिक लक्षणांपैकी एक आहे. शरीरातील खराब सर्क्यूलेशन, कोरडी त्वचा इत्यादींमुळे होते.

काळे, भूरकट, गडद रंगाचे डाग पडणे किंवा त्वचेचा रंग बदलणे : मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये त्वचेशी संबंधित डाग पडणे किंवा रंग बदलणे हे आजार दिसून येतात. याला एसेंथोसिस निगरिकन्स म्हटले जाते. यामध्ये त्वचा काळी पडणे, किंवा भूरकट रंगाचे तपकिरी डाग पडतात. मुख्यत्वे करून हे डाग मान, किंवा बगल, कंबर हात, हाताचे कोपर आणि गुडघ्यांवर पडतात. हे स्पर्श केल्यावर खूपच मऊसर वाटतात.

मधुमेहाचे छाले : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते ही समस्या त्या लोकांना होते जे आधीपासूनच मधुमेह न्यूरोपैथीने प्रभावित आहेत. यामध्ये अनियंत्रित मधुमेह तुमच्या नसांना प्रभावित करू शकतो आणि त्यांना नुकसान पोहोचवू शकतो. हे छाले बोटांवर हात पायांवर पडू शकतात. तसेच आपोआप ठीक देखिल होतात. मात्र क्वचित प्रसंगी ही लक्षणे मधुमेहाच्या प्रारंभिक लक्षणांमध्ये दिसून येऊ शकतात.

Diabetes Signs On Skin : डायबेटिक अल्सर : शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने मज्जातंतूंचे नुकसान होऊ लागते आणि रक्ताभिसरणही बिघडू लागते, त्यामुळे मधुमेहाच्या अल्सरच्या समस्येला सामोरे जावे लागते. शरीरातील इन्सुलिनची उच्च पातळी या जखमा भरू देत नाही. अशा स्थितीत या उघड्या फोडांना डायबेटिक अल्सर म्हणतात आणि ही समस्या पायाला सर्वाधिक भेडसावते. या खुल्या जखमांमुळे कायमचे नुकसान होऊ शकते आणि उपचार न केल्यास शरीराच्या अवयवांचे विच्छेदन देखील होऊ शकते. अशा प्रकारची समस्या आढळून आल्यास त्वरित मधुमेहाची चाचणी करून घ्यावी.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news