पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी “ढ लेकाचा” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन

dh lekacha
dh lekacha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास "ढ लेकाचा" या चित्रपटातून येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला 'अल्ट्रा झकास' या ओटीटीवर येणार आहे.

आज या सिनेमाचं पोस्टर पंढरपुरातील प्रसिद्ध विठ्ठलाच्या मंदिरात प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. अत्यंत निरागस भाव असलेलं हे लोभस पोस्टर पाहताच चित्रपटाच्या कथाविश्वाची कल्पना येते. पोस्टरवरील नवोदित बाल कलाकार आयुष उलागड्डे त्याच्या चेहऱ्यावरील विलक्षण भावमुद्राभिनय पाहून रसिक प्रेक्षकांना "ढ लेकाचा" चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे.

दिग्दर्शक जोगेश्वर ढोबळे दिग्दर्शित 'ढ लेकाचा' या चित्रपटाची कथा भाल्या या तरुण मुलाभोवती फिरते, भाल्याच्या शाळेत शिकत असणा-या विक्की देशमुख या विद्यार्थ्याला असलेल्या पैशाच्या माजामुळे गुंडगिरीचा सामना करत तसेच शाळेतील शिक्षणप्रणालीच्या अडचणींना तोंड देत शालेय जीवनात संघर्ष करावा लागतो. भाल्याचं त्याचे वडील आणि पाळीव बकरी बादशाहसोबत एक भावनिक नातं तयार होताना दिसत आहे. आपल्या मुलाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना भाल्या आणि त्याचे वडील सदा लोहार यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रिकरण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात बालकलाकार आयुष उलागड्डे सोबतच अतुल महेल, मुकुंद वसुले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news