

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीराम जन्मोत्सावानिमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामनगर येथील श्री राममंदिरात भेट दिली. त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत पूजा केली. मंदिरात उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. याप्रंसगी ढोलताशाच्या गजरासह श्रीरामाच्या जय घोषणाने मंदिर परिसर दुमदुमला होता. आमदार प्रवीण दटके व श्रीराम मंदिर समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
"चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी,
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती,
दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला,"
आधुनिक वाल्मिकी 'गदिमां'च्या शब्दातले रामजन्माचे हे वर्णन अवीट आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांचा हिंदू जनमानसावरील गेली हजारो वर्षे असणारा प्रभावही त्यापेक्षा दृढ आहे. ती श्रद्धा, भक्ती आणि आनंद आज सकाळी रामनगर चौक, नागपूर येथील राम मंदिरात अनुभवला. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या नयनमनोहर मूर्तींचे मनोभावे दर्शन घेतले. आशीर्वाद घेतले असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?