आशियातील १० प्रदुषित शहरांमध्ये दिल्लीचा समावेश नाही; केजरीवाल यांचा दावा

file photo
file photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आशियातील दहा सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये भारतातील ८ शहरे आहेत, पण त्यात दिल्लीचा समावेश नसल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका अहवालाचा आधार घेत सोमवारी (दि. २४) केला. काही वर्षांपूर्वीपर्यंत दिल्लीला जगातले सर्वात प्रदूषित शहर मानले जात असे. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही, असेही केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

केजरीवाल यांनी संबंधित प्रसारमाध्यमाचा अहवाल शेअर केला आहे. आशियातील १० सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये देशातील ८ शहरे आहेत, पण त्यात दिल्लीचा समावेश नाही. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीकर नागरिकांनी खूप प्रयत्न केले आहेत. पण अजूनही आपणास झटावे लागणार आहे. दिल्लीला जगातील सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news