Rishabh Pant | ऋषभ पंत फिट! पण IPL 2024 मध्ये खेळणार का?; रिकी पाँटिंगने दिली मोठी अपडेट

Rishabh Pant | ऋषभ पंत फिट! पण IPL 2024 मध्ये खेळणार का?; रिकी पाँटिंगने दिली मोठी अपडेट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या फिटनेसबाबत नवीन अपडेट दिले आहे. पाँटिंगने म्हटले आहे की, २६ वर्षीय ऋषभ पंतने बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) विकेटकीपिंगचा सराव सुरू केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंत अनेक अडचणींवर मात करत सध्या तो इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीपूर्वी काही गती मिळविण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे.

दरम्यान, एनसीएने आधीच पंतला मॅचसाठी फिट प्रमाणपत्र दिले आहे. याचाच अर्थ की पंत बीसीसीआयच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय आयपीएलमधील सर्व सामने खेळू शकतो. डिसेंबर २०२२ मध्ये भीषण कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. आता यातून त्याने बरा होऊन सराव सुरु केला आहे. पण पंत याच्याबाबत दिल्ली संघ कोणतीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. पाँटिंगने नमूद केले की पंत चांगल्या फिटनेससाठी प्रशिक्षण घेत आहे आणि त्याच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

ते पुढे म्हणाले की, फलंदाजी ही आता समस्या नाही आणि एका क्षणी संघ व्यवस्थापनाने पंतला आयपीएल २०२४ ला मुकावे लागेल अशी शक्यता व्यक्त केली होती. पण त्याने सर्व अडथळ्यांचा सामना करत वापसी करण्यासाठी पुरेसे धैर्य आणि समर्पण दाखवले आहे.

"त्याने गेल्या काही आठवड्यांत काही सराव सामने खेळले आहेत, जे आमच्यासाठी खरोखर उत्साह वाढवणारे आहेत. मला माहित आहे की तो आता ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर परत येण्यासाठी त्याने फिटनेसवर कठोर मेहनत घेतली आहे. त्याला एका सामन्यात खेळवण्यात आले. त्याने त्यात क्षेत्ररक्षण केले आणि आतापर्यंत फलंदाजी ही त्याच्यासाठी समस्या असल्याचे दिसत नाही," असे पाँटिंगने 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हटले आहे.

"आम्हाला साहजिकच काळजी आणि चिंता होती की तो कदाचित या वर्षी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी वेळेत तयार होणार नाही. तो संघात नसणे हा गेल्या वर्षी आमच्यासाठी खूप मोठा तोटा होता. गेल्या १२ किंवा १४ महिन्यांत तो काय होता याचे वर्णनही आम्ही करू शकत नाही," असेही पाँटिंग पुढे म्हणाला.

पंतला फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले असले तरी, तो आगामी हंगामातील सर्व सामने खेळेल की नाही याची दिल्ली कॅपिटल्सला खात्री नाही. याबद्दल बोलताना, पाँटिंगने म्हटले की त्यांना पंतच्या मॅच फिटनेसबद्दल खात्री नाही आणि जर तो सर्व सामन्यांसाठी फिट नसेल तर त्याला वेगळी जबाबदारी दिली जाईल.

'जर तो पूर्णपणे फिट नसेल….'

"आम्हाला हा एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. कारण जर तो फिट असेल, तर तो थेट कर्णधारपदावर परत येईल असे तुम्हाला वाटेल. जर तो पूर्णपणे फिट नसेल आणि आम्हाला त्याचा उपयोग थोड्या वेगळ्या भूमिकेत करायचा असेल तर आम्हाला तेथे काही निर्णय घ्यायचे आहेत," असे पाँटिंग म्हणाला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news