IPL Auction 2022 : श्रेयसला धोबीपछाड देत दीपक चहर ठरला सर्वात महागडा गोलंदाज

IPL Auction 2022 : श्रेयसला धोबीपछाड देत दीपक चहर ठरला सर्वात महागडा गोलंदाज
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : इंडियन प्रीमियर लीग २०२२ ( IPL Auction 2022 ) साठी खेळाडुंचा सर्वात मोठा लिलाव सुरु आहे. यंदा आयपीएलमध्ये दहा संघ खेळवले जात आहेत. लखनऊ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) हे दोन नवे संघ यंदा आयपीएलमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे खेळाडुंवर चढ्या भावाने बोली लावली जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) सर्वात महागडा खेळाडू ठरेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण श्रयेस अय्यर पछाडत गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar ) सध्याचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.

श्रेयस अय्यरची अत्यंत प्रभावशाली खेळाडूंमध्ये गणना होते. मागील हंगामात तो दिल्लीचा कर्णधार देखिल होता, पण दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर ऋषभ पंत याला कर्णधार पदाची धुरा देण्यात आली. श्रयेसकडे भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून देखिल पाहिले जाते. दिल्ली कॅपीटल्सने त्याला रिटेन न केल्यामुळे तो खरेदीसाठी सर्व संघाना उपलब्ध झाला होता. या लिलावासाठी श्रेयस अय्यर हा हॉट फेव्हरिट समजला जात होता. त्याला तशी बोली देखिल लागली आणि कोलकाता नाईटरायडर्स या शाहरुख खानच्या संघाने त्याला १२.२५ कोटीमध्ये खरेदी केले. या खरेदीमुळे कोलकाता नाईटरायडर्सने भविष्यातील कर्णधारास खरेदी केल्याचे बोलले जात आहे.

श्रेयसला १२ कोटीहून अधिक रक्कम जरी मिळाली असली तरी गोलंदाज तसेच अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दीपक चहरने श्रेयस अय्यर मागे टाकत सर्वात महागडा गोलंदाज होण्याचा मान पटकावला. त्याला चेन्नई सुपरकिंग्जने तब्बल १४ कोटी रुपयांना खरेदी केले. त्यामुळे यंदाच्या लिलावात तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी पेक्षा अधिक रक्कम दीपक चहरने पटकावली आहे. सीएसकेने यंदा रिटेनमध्ये धोनीला १२ कोटींमध्ये खरेदी केले आहे.

दीपक चहरला घेण्यासाठी अनेक संघामध्ये चढाओढ दिसली. अखेर यासर्वांमध्ये सीएसकेने दीपक चहरला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. दीपक चहर हा चैन्नई सुपर किंग्ज कडूनच खेळत होता. तो त्यांचा मुख्य गोलंदाज होता. तरी देखिल सीएसकेने त्याला रिटेन केले नव्हते, पण लिलावात अखेर आपल्या प्रमुख गोलंदाजाला चेन्नईच्या संघाने मोठ्या रकमेत खरेदी केले. दीपक चहर हा देशांतर्गत राजस्थान कडून खेळतो. गेल्या काही मालिकांमध्ये तो भारताच्या मुख्य संघाचा भाग देखिल बनला आहे. मागील आफ्रिका दौऱ्यातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत मोठी खेळी केली होती. तसेच सध्या वेस्ट इंडिज सोबत सुरु असलेल्या मालिकेत देखिल त्याने दमदार अष्टपैलू कामगिरी करुन दाखवली आहे. याच कामगिरीचा लाभ त्याला झाल्याचे दिसत आहे.

ईशान किशान ठरला यंदाचा सर्वात महागडा खेळाडू

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून ईशान किशनला ( Ishan Kishan ) लॉटरी लागली आहे. त्याला तब्बल १५.२५ कोटींना मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे. या पूर्वी इशान किशन हा मुंबई इंडियन्सचाच खेळाडू होता. पुन्हा मुंबईनेच त्याला मोठी रक्कम देत खेरदी केले आहे. यावेळच्या लिलावातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सीएकेने देखिल आपल्याच खेळाडूला म्हणजे दीपक चहरला मोठी रक्कम देत खरेदी केले आणि मुंबई इंडियन्सने देखिल पुन्हा ईशान किशान मोठी रक्कम देत खरेदी केले आहे.

कोणाला मिळाली किती रक्कम

  • ईशान किशन – मुंबई इंडियन्स – १५.२५ कोटी रुपये
  • दीपक चहर – चेन्नई सुपर किंग्ज – १४ कोटी रुपये
  • श्रेयस अय्यर – कोलकाता नाईट रायडर्स – १२.२५ कोटी रुपये
  • हर्षल पटेल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – १०.७५ कोटी रुपये
  • प्रसिद्ध कृष्णा – राजस्थान रॉयल्स – १० कोटी रुपये
  • कगिसो रबाडा – पंजाब किंग्ज – ९.२५ कोटी रुपये
  • जेसन होल्डर – लखनऊ सुपर जायंट्स – ८.७५ कोटी रुपये
  • शेमरॉन हेटमायर – राजस्थान रॉयल्स – ८.५० कोटी रुपये
  • शिखर धवन – पंजाब किंग्ज – ८.२५ कोटी रुपये
  • नितीश राणा – कोलकाता नाईट रायडर्स – ८ कोटी रुपये
  • ट्रेंट बोल्ट – राजस्थान रॉयल्स – ८ कोटी रुपये
  • देवदत्त पडिकल – राजस्थान रॉयल्स – ७.७५ कोटी रुपये
  • पॅट कमिन्स – कोलकाता नाईट रायडर्स – ७.२५ कोटी रुपये
  • फाफ डु प्लेसिस – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – ७ कोटी रुपये
  • क्विंटन डी कॉक – लखनऊ सुपर जायंट्स – ६.७५ कोटी रुपये
  • मोहम्मद शमी – गुजरात टायटन्स – ६.२५ कोटी रुपये
  • डेव्हिड वॉर्नर – दिल्ली कॅपिटल्स – ६.२५ कोटी रुपये
  • दीपक हुड्डा – लखनऊ सुपर जायंट्स – ५.७५ कोटी रुपये
  • रवींचंद्रन अश्विन – राजस्थान रॉयल्स – ५ कोटी रुपये
  • मनीष पांडे – लखनऊ सुपर जायंट्स – ४.६० कोटी रुपये
  • ड्वेन ब्रावो – चेन्नई सुपर किंग्ज – ४.४० कोटी रुपये
  • रॉबिन उथप्पा – चेन्नई सुपर किंग्ज – २ कोटी रुपये
  • जेसन रॉय – गुजरात टायटन्स – २ कोटी रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news