जीवघेणा थरार! काळ आला होता पण वेळ नाही; बसनं वृद्धाला चिरडलं, पण…(व्हिडिओ)

जीवघेणा थरार! काळ आला होता पण वेळ नाही; बसनं वृद्धाला चिरडलं, पण…(व्हिडिओ)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: मुंबईच्या पवई परिसरात एका वृद्ध व्यक्तीला बसने धडक देत त्यांना चिरडले. या भीषण अपघातात हा व्यक्ती दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे. या वृद्ध व्यक्तीला सुदैवाने वाचवण्यात यश मिळाले आहे. काळ आला होता, पण वेळ नाही याप्रमाणे अवजड बस अंगावरून जाऊनही हा वृद्ध या भीषण अपघातून बचावला आहे.

मुंबईतील पवई येथे लेकसाईड कॉम्प्लेक्सजवळील एव्हरेस्ट हाइट्स बिल्डिंगच्या बाहेर मंगळवारी दुपारीच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या 45 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडताना दिसत आहे. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने येणारी एक पांढऱ्या रंगाची बस त्या व्यक्तीला धडकते आणि त्याच्या अंगावरून जाते. तरीही या अपघातातील ही व्यक्ती बचावली आहे.

हादरलेले पादचारी आणि आजूबाजूचे स्थानिक प्रवाशी या बसचालकाला आरडाओरड करून बस थांबवण्यास सांगतात. यानंतर पाहिले असता, अंगावरून बस गेल्यानंतरही हा व्यक्ती उठण्याचा प्रयत्न करत असताना दिसतो. यावरून या वृद्ध व्यक्तीला कोणत्याही प्रकारे गंभीर दुखापत झालेली नसल्याचे दिसते. त्याला फक्त या अपघाताने धक्का बसला आहे. त्यानंतर अपघात झालेला हा वृद्ध व्यक्ती बस चालकाकडे गेला आणि त्याच्या निष्काळजीपणाबद्दल त्याला चांगलेच सुनावले.

मुंबईतील काही भागातील वाहतूक येथील नागरिकांना दररोज भयानक अनुभव देत आहे. समोर आलेल्या व्हिडिओवर टिप्पणी करताना, मुंबईच्या पवईच्या एका स्थानिकाने वाहतुकीची तक्रार केली आहे. की, निवासी-सह-व्यावसायिक, पवई-चांदिवली भागातील रहदारी वेडीवाकडी आहे. अशा घटना टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news