

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा नदी पात्रातील पाणी अत्यंत प्रदूषित झाले असून नदीमध्ये हजारो मृत मासे तरंगताना दिसत आहेत. अनेक लोक हे माझे पोत्यात भरून घेऊन जात आहेत. रात्री उशिरापर्यंत पंचगंगा शिये पुलाखाली मासे घेऊन जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांची गर्दी दिसत होती. सोमवारी पर्यावरण मंत्री येऊन गेले आणि मंगळवारी पंचगंगा प्रदूषणाचे भीषण वास्तव पुन्हा एकदा सर्वांसमोर आले.
गेले काही दिवस पंचगंगा नदी पात्रातील पाण्याचा रंग हिरवट झाला असून पाण्यास उग्र दर्प येत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे जाणकारातून बोलले जात आहे. १९ जानेवारी रोजी नदी पात्रात हजारो मासे तरंगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, यानंतर २० जानेवारी रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने घेतले होते.
वाढत्या जल प्रदुषणामुळे सोमवारी पंचगंगा नदीत हजारो मृत मासे पाण्यावर तरंगतानाचा दिसत होते. तसेच अनेक जण पोती भरून हे मासे घेऊन जात होते.