पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर तुम्ही डान्सचे (Dance) बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहत असतात. दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर व्हायरल होत तुमच्यापर्यंत आलेला पाहतो. यातील बरेच व्हिडिओ तुम्हाला आवडतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसू सुटते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे. एका शाळेतील कार्यक्रमातील. यामध्ये एक शिक्षक आणि शिक्षिका यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल (Viral video) होत आहे.
Dance : गणिताच्या शिक्षकाने धरला ठेका
शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. असाच कार्यक्रम एका शाळेत सुरु होता. त्यात शाळेतील शिक्षक लोकही एन्जॉय करत असतात. पण विचार करा जर शाळेतील विद्यार्थी सोडून जर शाळेतीलच शिक्षकच एन्जॉय करु लागले तर? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यात शाळेचे दोन शिक्षक गमतीशीर डान्स (Dance) करत असताना दिसत आहेत.
इंग्रजी शिकवणारी शिक्षिका गाण्यावर डान्स करायला जाते. तेव्हा गणिताचे सरसुद्धा डान्स करायला लागतात. डान्स सुरु करताच दुसऱ्या एक शिक्षिका त्यांना डान्स थांबवायला सांगतात. पण ते थांबायचं नावचं घेत नव्हते. शेवटी त्या कपाळावर हात मारत तिथून निघून जातात.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंमेंटसचा भन्नाट येत आहेत. एक युझर म्हणतं आहे, "गणिताच्या शिक्षकांनी शो चोरला" तर एक य़ुझर म्हणतं आहे, "गणिताच्या शिक्षकाला प्रिन्सिपलही रोखू शकली नाही".