Dada Bhuse : एसी कॅबिनमध्ये बसून, कानात गोष्टी करुन पक्ष चालत नाही : दादा भुसे
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशातून हजारो शिवसैनिकांनी अथक श्रमातून शिवसेना पक्ष उभा केला आहे. एसी कॅबिनमध्ये बसून, कानात गोष्टी करून पक्ष चालविता येत नाही, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्म विकासमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली.
ना. भुसे हे रविवारी (दि.२३) नाशिक दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या खा. राऊत यांनी राज्य सरकारवर टीका करताना येत्या १५ दिवसांत हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी केली. याकडे भुसे यांचे लक्ष वेधले असता एसीत बसून पक्ष चालविता येत नाही. तर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हजारो शिवसैनिकांनी श्रमातून पक्ष उभा केला. पक्ष उभा करताना अनेकांनी बलिदानदेखील दिले, असा टोला राऊत यांना लगावला.
खा. राऊत यांच्या भविष्यवाणीवर प्रतिक्रिया देताना भुसे यांनी आपल्या देशात स्वप्न पाहायला बंदी नाही. दररोज सकाळी उठल्यानंतर इकडे-तिकडे बघण्यापेक्षा सकाळ, दुपार, सायंकाळी समाजासाठी काम करावे. समाजातील गोरगरिबांच्या समस्या, शेतकऱ्यांचे व आमदारांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. तसेच आजही समाजातील अनेक घटकांना मूळ प्रवाहात आणण्याची गरज असून, ती जबाबदारी आपली आहे, असा खोचक टोलाही भुसे यांनी राऊत यांना लगावला.
हेही वाचा ;

