

तासगांव : पुढारी वृत्तसेवा ; मनसे ही भाजपची सी टीम आहे. राज ठाकरेंसारखा चांगला नेता देवेंद्र फडणवीसांच्या हातातला "बोलका बाहुला" बनला असल्याची बाेचरी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. तासगांव तालुक्यातील अंजनी येथे राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यानिमित्त आले असताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले, "राज ठाकरेंच इंजिन सध्या भाजपच्या रुळावर आणि त्यांच्याच पेट्रोल-डीझेलवर सुरु आहे. त्यामुळे ते राज्यात व देशात सामाजिक ऐक्य बिघडवण्यासाठी भडक वक्तव्य करत आहेत. एमआयएम ही भाजपची यापूर्वीची बी टीम आहेच. एमआयएम म्हणजे "मोदी इंपोर्ट मेंबर" तर मनसे म्हणजे "मोदी नकलाकार सेना" आहे. जी स्क्रीप्ट भारतीय जनता पार्टी राज ठाकरेना देते तेवढेच ते सध्या बोलत आहेत. देशातील व राज्यात अनेक समस्या असताना भोंग्या बाबतीत बोलून राज ठाकरे सामाजिक सलोखा बिघडवत आहेत, असा आराेपही त्यांनी केला.
पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ तोंडावर आपटलेल्या आहेत. पीडित तरुणीस धमकावून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या वाघ यांचा ब्लॅकमेलिंग हा व्यवसाय आहे. भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्कारसारखा गंभीर गुन्हा दाखल झाला असतानाही चित्रा वाघ मुग गिळून का गप्प आहेत. असा सवालही शेख यांनी केला. यावरुन अर्थ चित्र वाघ यांना महिला अत्याचारबाबतीत फक्त पक्ष बघून भूमिका घेतात. अशीही टीकाही मेहबूब शेख यांनी केली.
हेही वाचलतं का?