

पुढारी ऑनलाईन डेस्क : सकाळी-सकाळी उठल्यानंतर सर्वच महिलांना प्रश्न पडतो तो म्हणजे, नाश्त्याला काय बनवायचे? दररोजचे कांदे पोहे, शिरा आणि उपीट खाऊन प्रत्येकाला कंटाळा येतो. धावपळीच्या जीवनात कमीत-कमी साहित्यात आणि पटकन बनणारा पदार्थ असेल तर वेळ आणि पैसा वाचतो. तर काही पदार्थ कामाच्या व्यापातून बाहेर आल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशीसुद्धा करून ठेवायचा असेल तर मग आनंदच. हे पदार्थ नसेल मग सकाळी- सकाळी चहासोबत पर्याय उरतो ते म्हणजे, कुककुरीत खारी आणि बिस्किटचा. आता खारीसारखा दिसणारा आणि खमंग, खुसखुशीत चिरोटे समोर आले तर मग काय मज्जाच राव! मग जाणून घेऊया खारीसारखे तोंडात पटकन विरघळणारे तिखट चिरोटे कसे करायचे? ( Crispy Chirote Recipe )
तांदळाचे पीठ – १ वाटी
गव्हाचे पीठ – ३ वाटी
घरगुती तुप- अर्धा कप
बटर किंवा डालडा- १०० ग्रॅम
मेथी- २ चमचा
चीली फ्लेक्स- २ चमचा
कुटलेले जीरे- १ चमचा
कुटलेली काळी मिरी- १ चमचा
रवा- अर्धा कप
ओवा- १ चमचा
कॉर्न फ्लॉवर- २ चमचे
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
१. पहिल्यांदा एका मोठ्या पसरट भांडे किंवा परातीत गव्हाचे पीठ, रवा आणि तूप एकत्रित करून चांगळे मळून घ्यावे.
२. या मिश्रणात चीली फ्लेक्स, काळी मिरी, मेथी, ओवा, कुटलेले जीरे, चवीनुसार मीठ घालावे. यानंतर सर्व मिश्रणात थोडे-थोडे पाणी घालून ते एकत्रित चांगले आणि घट्ट मळून गोळा तयार करावा. यानंतर दोन तास हे मिश्रण भिजण्यासाठी झाकून ठेवावे.
३. दोन तासानंतर पुन्हा हे पीठ हलक्या हाताने मळून घेऊन त्याचे गोळे तयार करावे. (टिप- चपाती, पोळीसोरखे गोळे बनवावे)
४. यानंतर एका वाटीत बटर, कॉर्न फ्लॉवर आणि तांदळाचे पीठ एकत्रित करून घ्यावे. (टिप- जर बटर मिळाले नसेल तर यात तूप, डालडा घालू शकता)
५. तयार केलेल्या सर्व गोळ्याची पोळी, चपाती लाटून घ्याव्यात.
६. यानंतर एक पोळी घेऊन त्यावर वाटीत तयार केलेले मिश्रण हाताने सर्व पोळीवर पसरवून घ्यावे.
७. अशाच प्रकारे एका पोळीवर दुसरी ठेवून यानंतर त्यावर तिसरी पोळी ठेवून सर्व पोळ्यांना ते मिश्रण लावून घ्यावे.
८. यानंतर सर्व पोळ्यांचा एक मोठा लांब रोल बनवावा आणि या रोलचे चाकूने छोटे-छोटे काप कापून घ्यावेत.
९. यानंतर हा रोल पुरीच्या आकारासारखा लाटून घ्या. याप्रमाणे सर्वच रोल लाटून घ्यावेत.
१०. गॅसवरील कढाईत तेल गरम करून घ्यावे आणि त्यात तयार झालेले हे चिरोटे तळून घ्यावेत.
११. हे चिरोटे चहासोबत सकाळचा नाश्ता तयार आहेत. ( Crispy Chirote Recipe )
हेही वाचा :