पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून हत्या | पुढारी

पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून हत्या

मुंबई पुढारी वृत्तसेवा : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून होणार्‍या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून 37 वर्षीय विवाहितेने माहेर गाठले. मात्र पतीने येथेही तिचा पिच्छा सोडला नाही. पत्नी घरी नांदायला येत नाही या रागातून त्याने पत्नीवर चाकूने सपासप वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची घटना विद्याविहार पूर्व परिसरात घडली. हत्येचा गुन्हा दाखल करुन टिळकनगर पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह साथिदाराला अटक केली.

शास्त्रीनगर परिसरातील दिपाली हिचा 2012 मध्ये सतिश जावळे याच्याशी विवाह झाला. विवाहनंतर ती वरळी येथील सासरी नांदायला गेली. काही महिने सुरळीत संसार चालल्यानंतर सतीशने शारिरीक, मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सतीश हा काहीही कामधंदा करत नव्हता. 12 जूनला झालेल्या भांडणानंतर दिपालीने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार करत माहेर गाठले.

19 जून रोजी दिपाली ही येथील एम. जी. रोडवरील एका सलूनच्या कट्ट्यावर आईची वाट बघत उभी होती. सतिशने सोबत आणलेल्या चाकूने दिपालीवर वार करुन मित्रासोबत पसार झाला. दिपालीच्या आई नंदा (60) यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिपालीला तात्काळ उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

विद्याविहारमधील घटना, पतीसह साथीदाराला अटक

हेही वाचा

Back to top button