Corona updates | कोरोनाबाबत सतर्क रहा, पण अनावश्यक भीती नको! केंद्राकडून राज्यांना सूचना

Corona updates | कोरोनाबाबत सतर्क रहा, पण अनावश्यक भीती नको! केंद्राकडून राज्यांना सूचना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांनी आज शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. या दरम्यान, कोविड चाचणी आणि जिनोम सिक्वेन्सिंगसह कोविड नियमांबाबत जागृती वाढविण्याबाबत चर्चा झाली. आपण सतर्क राहिले पाहिजे आणि कोरोनाबाबत कोणतीही अनावश्यक भीती पसरवण्याचे टाळले पाहिजे, असे मांडविया यांनी म्हटले आहे.

सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील कोविड परिस्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबत आढावा बैठक घेण्याची सूचना करण्यात आली आहे. १० आणि ११ एप्रिल रोजी कोविड संदर्भात संपूर्ण देशात मॉक ड्रिल होईल. ज्यात सर्व आरोग्यमंत्र्यांनीदेखील हॉस्पिटलला भेट द्यावी, असे सांगण्यात आल्याचे मांडविया यांनी ट्विट करत म्हटले आहे.

केंद्राने कोविड १९ संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नियमितपणे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांतील स्थितीचा आढावा घेतला असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत ६,०५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या २८,३०३ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण ०.०६ टक्के एवढे आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७५ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ३,३२० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३.३९ टक्क्यांवर गेला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.०२ टक्के आहे, असे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.

याआधी गुरुवारी दिवशी देशात कोरोनाचे ५,३३५ रुग्ण आढळून आले होते. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत २० टक्क्यांची वाढ दिसून आली होती. केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्येत अधिक वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात (३० मार्च- ५ एप्रिल) दरम्यान २६,३६१ रुग्णांची नोंद झाली होती. याआधीच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १३,२७४ एवढी होती. याचाच अर्थ गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे. (Coronavirus Updates)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news