Congress lunch party : अधिक मासानिमित्त काँग्रेसतर्फे कार्यकर्त्यांना धोंडेजेवण; राजकीय मेजवानीचा पहिलाच प्रयोग

Congress lunch party : अधिक मासानिमित्त काँग्रेसतर्फे कार्यकर्त्यांना धोंडेजेवण; राजकीय मेजवानीचा पहिलाच प्रयोग
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर निराश झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिक मासाचे औचित्य साधत धोंडे जेवणातुन कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका दृष्टीक्षेपात ठेवून शुक्रवारी (दि. ११) होणारा हा कार्यक्रम पक्षाला उभारी देईल ही कार्यक्रम आयोजनाची महत्त्वाची भुमिका असेल. (Lunch from Congress)

निलंगा केंद्रबिंदू माणून निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी यांना खास निमंत्रण पाठवून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघात माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार धिरज देशमुख, प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

अधिक मासात सर्वत्र धार्मिक कार्यक्रम तसेच जावई यासाठी हा महिना लाभदायक राहतो असे सर्वश्रुत असले तरी पक्षाचा हा धोंडेजेवणाचा कार्यक्रम मात्र कोणासाठी लाभदायक असेल? अशी चर्चा ही मतदारसंघात आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेकजण काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. तोच धागा पकडत डॉ. अरविंद भातांब्रे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे बोलले जात असले तरी कार्यकर्त्याचा मेळावा पक्षाच्या वतीने घेण्याचे नियोजन पुर्वीच होते.दोन तारखा ही बदलल्या.आता अधिकमास असल्याने धोंडेजेवण होत आहे असे स्पष्टीकरणही काहींनी दिले.

हे धोंडेजेवण पचेल

काँग्रेसचा मेळावा अन् धोंडेजेवणाचे आयोजन, देशमुखांच्या उपस्थितीत निलंगेकरांना हे धोंडेजेवण कोणाला पचणार अन् कोणाला रुतणार जेवणानंतरच कळेल.

हा पक्षीय मेळावा

हा पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबुत व्हावी. पक्षाची विचारधारा सामान्यांपर्यंत पोहोचवावी यासाठीचा मेळावा असुन उमेदवारीचे हे शक्तिप्रदर्शन नव्हे तसा अर्थ कोणीही काढू नये. पक्षात अनेकजण इच्छूक आहेत. त्यावेळी पक्ष ज्यांना उमेदवारी जाहीर करील त्यांच्या पाठीशी सर्वच राहतील असा सुचक सल्ला पक्षातले जाणकार देत आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बदलले

या कार्यक्रमाची पत्रिका मतदार संघात वाटप झाली.तितकीच सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाली.या पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे आहेत.पण ही बाब जणु निलंगेकरांना खटकली असावी म्हणूनच की काय कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पत्रकार परिषद घेवुन कार्यक्रमाचे अध्यक्ष हे अशोकराव पाटील निलंगेकर असल्याचे जाहीर केले..यावरून हे धोंडेजेवण निलंगेकरांना पचेल अशी पुष्टीही आता जोडली जाते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news