

चंदीगढ; पुढारी ऑनलाईन : पंजाबचे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची उद्या पटियाला तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. १९८८ च्या रोड रेज प्रकरणात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला शिक्षा जाहीर केली होती. गेल्या वर्षी १९ मे रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. २६ जानेवारी रोजी 'आझादी का अमृत महोत्सव' योजनेअंतर्गत नवज्योतसिंग सिद्धू यांची मुदतपूर्व सुटका झाल्याची बातमी समोर आली होती. (Navjot Singh Sidhu Release)
या योजनेंतर्गत ५२ कैद्यांच्या यादीत सिद्धू यांचे नावही समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले, पण पंजाब सरकारने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आता त्यांना १ एप्रिल रोजी सोडले जाऊ शकते, जिथे त्यांना ४५ दिवसांची सूट मिळत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची शिक्षा १६ मे रोजी पूर्ण होत असली तरी त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांची सुटका होत आहे. (Navjot Singh Sidhu Release)
२७ सप्टेंबर १९८८ रोजी नवज्योतसिंग सिद्धू यांचा पटियाला येथे पार्किंगबाबत गुरनाम सिंग नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. यानंतर सिद्धू यांनी त्या व्यक्तीस मारहाण केली होती. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तब्बल ३४ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल आला आणि त्या मध्ये सिद्धू दोषी ठरले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात त्यांना १० महिन्यांची शिक्षा सुनावली. तेव्हापासून ते पटियाला कारागृहात बंद होते.
सिद्धू यांनी एकदाही पॅरोल घेतला नाही
आतापर्यंतच्या शिक्षेत सिद्धू यांनी एकदाही पॅरोल घेतलेला नाही. तज्ज्ञांच्या मते, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमधील कैदी वगळता इतर सर्वांना त्यांच्या कामातील कामगिरी आणि वर्तनाच्या आधारावर महिन्यातून चार ते पाच दिवसांची सवलत दिली जाते. याशिवाय काही सरकारी सुट्ट्यांचाही लाभ कैद्याला मिळतो. अशा परिस्थितीत या सूटचा फायदा घेत सिद्धू यांची १ एप्रिलला तुरुंगातून सुटका होऊ शकते, असा अंदाज आहे.
अधिक वाचा :