

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने आयटी क्षेत्रांतील नियमांत मोठे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार फेसबुक, ट्वीटर, युट्युब आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला घटनात्मक तरतुदींचे पालन करणे, अनिवार्य असणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील उपलब्ध असणाऱ्या साधनांबाबत तसेच इतर मुद्यांवरील तक्रारींचे निवारण करण्यासाठी शुक्रवारी (दि. २८) आयटी नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. (Complaints About Social Media)
यासाठी तीन महिन्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. शुक्रवारी बदल करण्यात आलेल्या या नियमांनुसार पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत 'तक्रार निवारण समिती' स्थापन करण्यात येईल. तक्रार निवारण समित्यांच्या स्थापनेसाठी २०२१ च्या नियमांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने २०२२ मध्ये लागू केलेल्या नियमांनुसार तीन महिन्यांच्या कालावधीत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येईल. (Complaints About Social Media)
प्रत्येक समितीमध्ये एक अध्यक्ष आणि केंद्र सरकारकडून नियुक्त केलेले दोन पूर्णवेळ सदस्य असतील. तक्रारदार अधिकाऱ्याच्या निर्णयाबाबत असहमत असल्यास तो व्यक्ती या समित्यांकडे तक्रार करू शकतो. यासाठी केंद्र सरकारने २०२१ इलेक्ट्रॉनिक्स आणि आईटी मंत्रालयाने मसुदा लागू केला होता. ज्यामध्ये एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. (Complaints About Social Media)