NZvsSA Test : न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर, द. आफ्रिकेच्या दुस-या डावाला गळती

NZvsSA Test : न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर, द. आफ्रिकेच्या दुस-या डावाला गळती
NZvsSA Test : न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर, द. आफ्रिकेच्या दुस-या डावाला गळती
Published on
Updated on

क्राइस्टचर्च; पुढारी वृत्तसेवा : क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (NZvsSA Test) पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात 482 धावा करत मोठी आघाडी घेतली. हेन्री निकोल्सने शानदार शतक झळकावले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली असून 34 धावांवर संघाने 3 विकेट गमावल्या. सामन्याच्या दुस-या दिवसाअखेर, रेसी व्हॅन डर ड्युसेन 9 आणि टेम्बा बावुमा 22 धावांवर खेळत आहेत.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने (NZvsSA Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या 3 बाद 116 या धावसंख्येपुढे खेळण्यास सुरुवात केली. नील वॅगनर आणि हेन्री निकोल्स यांनी चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. वॅग्नरने 49 धावांची सुरेख खेळी केली. यानंतर मधल्या फळीत डॅरिल मिशेलने 16 धावा केल्या. हेन्री निकोल्स 105 धावा करून बाद झाला.

मॅट हेन्रीची 58 धावांची जलद खेळी

निकोल्सची विकेट पडल्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी उत्कृष्ट योगदान दिले. ब्लंडेलने 96 आणि ग्रँडहोमने 45 धावा केल्या. विशेष म्हणजे पहिल्या डावात 7 विकेट्स घेत विक्रम रचणा-या मॅट हेन्रीने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या 68 चेंडूत नाबाद 58 धावा करून संघाला 482 धावांपर्यंत पोहचवले. दक्षिण आफ्रिकेकडून डुआन ऑलिव्हरने 3 बळी घेतले. (NZvsSA Test)

दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात पुन्हा एकदा अत्यंत खराब झाली. अवघ्या 4 धावांत त्यांनी 3 महत्त्वाच्या विकेट गमावल्या. दोन्ही सलामीवीरांना आपले खातेही उघडता आले नाही, त्यात कर्णधार डीन एल्गरचाही समावेश आहे. रेसी व्हॅन डर ड्युसेन आणि टेम्बा बावुमा यांनी आतापर्यंत 30 धावांची भागीदारी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही न्यूझीलंडपेक्षा 353 धावांनी मागे असून यजमान संघाला विजयासाठी सात विकेट्ची गरज आहे. (NZvsSA Test)

द. आफ्रिकेचा पहिल डाव ९६ धावांवर गुंडाळला… (NZvsSA Test)

आठ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ धावांत सात बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले. ट्रेंट बोल्टच्या जागी मॅट हेन्रीला संघात आणण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाने खेळपट्टीवर उतरताच दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी उद्ध्वस्त केली. हेन्रीने 15 षटकांत 23 धावा देत सात बळी घेतले. मॅट हेन्रीच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्याच दिवशी पहिल्या डावात अवघ्या 95 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किवी संघाने 3 बाद 116 धावा केल्या. (NZvsSA Test)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news