

येवला : पुढारी वृत्तसेवा-अवकाळी पावसामुळे आपल्या मतदारसंघात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता येवल्यात आलेल्या भुजबळांना मराठा जनतेचा रोष पत्करावा लागला. आपल्या दौऱ्याचा मार्ग मराठा तरुणांच्या आक्रमकतेमुळे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना बदलवा लागला.
येवला शहरातील विंचूर चौफुलीवर मराठा तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भुजबळ विरुद्ध घोषणाबाजी सुरू केली होती. यावेळेस एक मराठा लाख मराठा आणि भुजबळ गो बॅक (Bhujbal go back) अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या दौऱ्यासाठी भुजबळांना दुसऱ्या रस्त्याने जावे लागले. मात्र तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी भुजबळांचा दौरा आहे त्या त्या ठिकाणी भुजबळांना सकल मराठा समाजातर्फे भुजबळ गो बॅक घोषणांचा सामना करावा लागत आहे. तर सोमठाणे येथे विशीवर भुजबळांच्या विरोधासाठी सकल मराठा समाज कडून घोषणाबाजी व निदर्शने सुरू आहे.
दरम्यान काल रात्रीपासूनच भुजबळांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट फिरत होत्या. सोमठाण येथील एका तरुणाने तर भुजबळांना फोन करुन गावात येऊ नका, म्हणून सांगितले होते. त्याची ऑडियो क्लीपही व्हायरल झाली आहे.
हेही वाचा :