

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्रयान-३ मोहिमेसाठी रॉकेट इंजिन चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) कडून देण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी रोजी तामिळनाडूमधील महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्सच्या हाय अल्टिट्यूड टेस्ट फॅसिलिटीमध्ये २५ सेकंदांच्या नियोजित वेळेत ही चाचणी पार पडली. या चाचणी दरम्यान, सर्व मापदंड समाधानकारक आढळले, असे इस्रोने सोमवारी स्पष्ट केले आहे.