

चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणी कंपनीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच अभूतपूर्व यश मिळाले आहे. रविवारी (दि.१६) बोफोर्स व अन्य तोफांसाठी लागणारे साहित्याची 80 कोटीची पहिली खेप चंद्रपूर आयुध निर्माणीने बल्गेरियाला रवाना केली आहे. (Chandrapur)
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कार्यरत असलेल्या आयुध निर्माणी म्युनिशन्स इंडिया लिमिटेड या कंपनीत परिवर्तित झाल्यानंतर बोफोर्स व अन्य तोफांसाठी लागणारे १५५ एमएम तोफगोळे तयार करण्यात आले. कंपनीत परिवर्तन झाल्यानंतर रविवारी (दि.१६) बल्गेरिया देशासाठी एक हजार कोटींच्या ऑर्डर पैकी ८० कोटीची पहिली परदेशी निर्यात खेप चंद्रपूर आयुध निर्माणीने रवाना केली आहे. बोफोर्स व अन्य तोफांसाठी लागणारे १५५ एमएम तोफगोळे समारंभपूर्वक रवाना केले. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड या कंपनीत परिवर्तित झाल्यानंतर चंद्रपूर आयुध निर्माणी प्रकल्पाने तोफगोळे स्थापित केले आहेत. पहिली परदेशी ऑर्डर रवाना होण्यास सुरूवात झाल्याने चंद्रपूर आयुध निर्माणीच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
चंद्रपूरच्या भद्रावती येथील आयुध निर्माणीच्या वाटचालीत रविवारचा (दि.१६) दिवस अभूतपूर्व यशाचा ठरला. ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीत परिवर्तन झाल्यानंतर निर्माणीमध्ये पहिली परदेशी खेप निर्यातीसाठी तयार करण्यात आली. बल्गेरिया देशाने एक हजार कोटीची खेप ऑर्डर केली होती. त्यापैकी ८० कोटीची पहिली खेप चंद्रपूर आयुध निर्माणीने रवाना केली.
बोफोर्स व अन्य तोफांसाठी लागणारे १५५ एमएम तोफगोळे या खेपेतून समारंभपूर्वक रवाना करण्यात आले. ही आयुध निर्माणी पुणे-खडकी येथील म्युनिशन्स इंडिया लिमिटेड या कंपनीत परिवर्तित झाल्यानंतर प्रकल्पाने उत्पादनाचे नवे कीर्तिमान स्थापित केले आहेत. त्यातच आता पहिला परदेशी ऑर्डर रवाना होण्यास सुरूवात झाल्याने चंद्रपूर आयुध निर्माणीच्या यशात मानाचा तुरा खोवला गेलाय.
म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ही भारतातील दारुगोळा तयार करणारी सर्वात मोठी कंपनी असून भारतीय सैन्यदल आणि परदेशात देखील विविध शस्त्रांसाठीचा दारुगोळा ही कंपनी तयार करते. चंद्रपूर आयुध निर्माणीत गायडेड पिनाका रॉकेट, पिनाका एडीएम टाईप 1 रॉकेट, 155 MM स्मार्ट अम्युनिशन यांची निर्मिती करण्यात येते. चंद्रपूर आयुध निर्माणीला देश-विदेशातून शेकडो ऑर्डर्स प्राप्त झाल्या असून त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा