

पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे, खासदार प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, रुपाली चाकणकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच अधिकारी उपस्थित होते. चांदणी चौकात होणार्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार असून, 400 कोटी रुपये खर्चून येथे मोठा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
आज चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव होते. मात्र एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसापासून ठीक नसल्याने ते त्यांच्या मूळ गावी आराम करण्यासाठी गेले असल्याने मुखमंत्री एकनाथ शिंदे आजच्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
नाराजी नाट्यानंतर मेधा कुलकर्णीही उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आहेत. कुलकर्णी यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने त्या नाराज झाल्या असल्याचे वृत्त आपल्याला पहिला मिळालं होत. मात्र मेधा कुलकर्णी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
हेही वाचा