

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक रोखे (इलेक्टोरल बाँड) खरेदी करण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात हैदराबादस्थित मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि NMDC आयर्न अँड स्टील प्लांट आणि पोलाद मंत्रालयाच्या आठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'एनआयएसपी'च्या ३१५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनियमितता झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सीबीआयने आज (दि. १३) स्पष्ट केले. लाच दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीने 966 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले होते हाेते.
174 कोटी रुपयांची बिले काढण्यासाठी 78 लाख रुपयांची लाच
जगदलपूर इंटिग्रेटेड स्टील प्लांटशी संबंधित कामांच्या संदर्भात मेघा इंजिनिअरिंगची 174 कोटी रुपयांची बिले काढण्यासाठी 78 लाख रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. 'सीबीआय'च्या म्हणण्यानुसार, लाच घेतल्याच्या आरोपाखाली एनआयएसपी आणि एनएमडीसीच्या आठ अधिकाऱ्यांची आणि मेकॉनच्या दोन अधिकाऱ्यांचीही नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
हेही वाचा