Canada wildfire | कॅनडातील ब्रिटिश कोलंबियात अग्नीतांडव; आणीबाणी घोषित; १५ हजार घरे खाली करण्याचे निर्देश
पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडातील सर्वात पश्चिमेकडे असलेल्या ब्रिटिश कोलंबिया प्रदेशातील जंगलातील आगीच्या गंभीर स्थितीमुळे आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. कॅनडाच्या पश्चिम दिशेला असलेल्या केलोन या शहराच्या आजूबाजूच्या परिसरात जंगलातील आग पसरली असून, यामध्ये अनेक घरे नष्ट होण्याची शक्यता आहे. यामुळे येथील जनजीवनाला देखील धोका पोहचू शकत, म्हणून कॅनडा सरकारने पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया प्रदेशातील (Canada wildfire) सुमारे १५ हजारांहून अधिक घरे खाली करण्याचे आदेश येथील नागरिकांना दिले आहेत, असे वृत्त 'बीबीसीने' दिले आहे.
Canada wildfire : केलोना शहरातील २४ हजारांहून अधिक घरे रिकामी
बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ हजार लोकसंख्या असलेल्या पश्चिम केलोना शहरात 'महत्त्वपूर्ण' इमारतींना आग लागली. आग पसरण्यापूर्वी येथील २४ हजारांहून अधिक घरे रिकामी करण्यात आली आहेत. ब्रिटीश कोलंबिया या संपूर्ण प्रांतासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे, दरम्यान, याठिकाणी (Canada wildfire) शेकडो आगी अजूनही जळत आहेत.
ब्रिटिश कोलंबियाची राजधानी 'यलोनाइफ' शहरातून १९ हजार रहिवाशांचे स्थलांतर
कॅनडाच्या वायव्य प्रदेशांची राजधानी असलेल्या यलोनाइफ शहराच्या दिशेने देखील मोठे आगीचे लोट सरकरत आहेत. बुधवारी (दि.१६) येथील प्रशासनाकडून घरे खाली करण्याची अधिसूचना काढली होती. त्यामुळे येथील बहुतांशी नागरिकांनी कार किंवा विमानाने प्रवास करत, संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. या शहराच्या २० हजार रहिवाशांपैकी सुमारे १९ हजार रहिवाशांनी आत्तापर्यंत स्थलांतर केले आहे, असे ब्रिटिश कोलंबिया प्रदेशाचे पर्यावरण आणि समुदाय मंत्री शेन थॉम्पसन (Canada wildfire) यांनी सांगितले.
परिस्थिती आणखी आव्हनात्मक होण्याची शक्यता-ब्रिटिश कोलंबियाचे प्रमुख डेव्हिड एबाय
ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर डेव्हिड एबे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून (एक्स) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, यावर्षी आम्ही ब्रिटीश कोलंबियातील आत्तापर्यंतच्या सर्वात वाईट जंगल आगीचा समाना करत आहेत. गेल्या २४ तासांपासून येथील परिस्थिती झपाट्याने गंभीर होत आहे. येत्या काही दिवसांत ती आणखी आव्हानात्मक होण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेता कॅनडातील या प्रदेशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे, असे डेव्हिड एबाय यांनी म्हटले आहे. (Canada wildfire)
हेही वाचा:
- Canada wildfire | कॅनडात अग्नीतांडव; जंगलातील वणवा भडकला, अख्खं येलोनाइफ शहर रिकामे करण्याचे आदेश
- Hawaii wildfires | हवाईतील मृतांचा आकडा ८० वर, हजारो घरे अन् गाड्या जळून खाक, उद्ध्वस्त लाहैना शहराची भीषणता आली समोर (Video)
- Hawaii wildfires : भारतातून अमेरिकेत आयात केलेला १५० वर्षांचा वटवृक्ष जळून खाक

