केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गतवर्षी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बूस्टर अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी काहीसा तसाच अर्थसंकल्प राहण्याचा अंदाज आहे. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन सादर करीत असलेला हा चौथा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पावर अंतिम हात फिरविण्यात जे वरिष्ठ अधिकारी सामील आहेत, त्यात देवाशीष पांडा, टी. व्ही. सोमनाथन, तरूण बजाज, अजय सेठ, तुहीनकांत पांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. (budget 2022 expectations)