ऊस-तोड मजुरांच्या ट्रॅक्‍टरला धडकेत ४ जण ठार
ऊस-तोड मजुरांच्या ट्रॅक्‍टरला धडकेत ४ जण ठार

छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा देऊन घरी येताना भीषण अपघात; तिघे बहिण-भाऊ जागीच ठार

Published on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोन हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत दुचाकीस्वारांना चिरडले. यात परीक्षा देवून घरी परतणारे तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले. हा भीषण अपघात बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला. मृत तिघेही बहीण-भाऊ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दरवाडे यांनी दिली.

प्रवीण अंभोरे, प्रतिक्षा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. ते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. त्यांच्याजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. प्रतिक्षाची वन विभागाची मैदानी चाचणी होती. सकाळी शेंद्रा भागात मैदानी चाचणी झाली. तेथून घरी येताना हा अपघात झाला. मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तिन्ही मृतदेह घाटीत पाठवले आहेत. या घटनेची चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news