

पुढारी ऑनलाईन : दारूचे व्यसन आरोग्यासाठी हानिकारक असतेच; परंतु, दारूचे अतिसेवक जीवावरही बेतते. अलिकडेच पोलिश स्ट्रिप क्लबमधील सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराची पुन्हा चर्चा होवू लागलेली आहे. येथे एका ब्रिटीश पर्यटकाने (British Tourist Dies) ९० मिनिटांत तब्बल २२ पेग रिचवले होते. अतिदारु पिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. आता त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचे गूढ उलगडण्यात पोलंड पोलिसांना यश आले आहे.
ब्रिटनमधील एक पर्यटक २०१७ मध्ये पोलंडला गेला होता. तेथे तो आपल्या मित्रासोबत वाइल्ड क्लबमध्ये नाईट आऊटला गेला. दरम्यान, तो येथे जाण्यापूर्वी दारूच्या नशेत होता. मृत व्यक्तीला त्याचा मित्र मार्क याने अधिक दारू पिण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता; पण क्लबमधील कर्मचाऱ्याने त्याला दारूचे एकाहून एक पेग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. संबंधित मृत ब्रिटीश पर्यटकाने क्लब कर्मचाऱ्याचे चॅलेंज स्वीकारत, एकामागून एक पेग घेण्यास सुरूवात केली आणि तो बेशुद्ध झाला. दारूचे तब्बल २ डझनभर पेग रिचवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. क्लबच्या कर्मचाऱ्याने या ब्रिटीश पर्यटकाकडून २,२०० पोलिश झ्लॉटी (पोलंडचे चलन) म्हणजे भारतीय ४२ हजार ८१६ रूपयांची रक्कम लुटली (British Tourist Dies) .
पोलंडमधील पोलिश सेंट्रल पोलिस इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (CBSP) ने दिलेल्या माहितीनुसार, "पर्यटकाच्या मृत्यूनंतर त्याच्या रक्तातातील दारूचे प्रमाण हे ०.४ टक्के इतके होते. विशेषत: जर मानवी शरीरात रक्तातील दारूचे प्रमाण जर ०.३ टक्के किंवा त्याहून अधिक झाल्यास विषबाधा (British Tourist Dies) होऊ शकते. येथील क्लबर्स एक रॅकेट चालवतात. ज्याद्वारे क्लबमध्ये येणाऱ्या ग्राहकाला मोठ्या प्रमाणात दारू पाजली जाते आणि त्यानंतर त्यांच्याकडचे पैसे लुटले जातात, हे एका प्रकरणाच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित पर्यटकांला लूटीच्या उद्देशानेच दारु पाजण्यात आली असल्याचे तपासात उघड झाले आहे."
इंग्लडमधील राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, "तुम्ही जर अधिक वेगाने आणि अति प्रमाणात दारू प्याल, तर त्यामुळे शरीरात विषबाधा होते. यामुळे तुम्ही गंभीर आजारी पडू शकता किंवा तुम्हाला रूग्णालयात दाखल करावे लागू शकते. तर काहीवेळा मृत्यू देखील येऊ शकतो."