Rishi Sunak with Akshata Murthy in Akshardham Temple
Rishi Sunak with Akshata Murthy in Akshardham Temple

Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक पत्नीसह अक्षरधाम मंदिरात; परंपरेप्रमाणे अनवाणी पायाने प्रवेश; भगवान स्वामी नारायणांची केली आरती (फोटो व्हायरल)

Published on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Rishi Sunak : G20 परिषदेसाठी भारतात आलेले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिराला पोहोचले. त्यांनी येथील परंपरेप्रमाणे भगवान स्वामी नारायण यांचे दर्शन घेतले. G20 साठी भारतात आल्यानंतर ऋषी सूनक यांनी हिंदू असल्याचा गर्व आहे, असे म्हटले होते. त्यांनी अक्षरधाम मंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे पावसात छत्री घेऊन त्यांनी पत्नीसह परंपरेप्रमाणे अनवाणी पायाने मंदिरात प्रवेश केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या अधिक माहितीनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक आणि त्यांच्या अक्षता मूर्ती पत्नी मंदिराच्या परंपरेप्रमाणे मंदिरात अनवाणी गेले. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. त्यांनी मंदिरात पूर्ण एक तास घालवला. अक्षरधाम मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे म्हणाले की सूनक मंदिरात अनवाणी गेले. मंदिराला भेट देताना पाळण्यात येणारी ही हिंदू परंपरा आहे. ऋषी सूनक यांना भेटल्यानंतर असे वाटले की ते सनातनच्या अगदी जवळ आहेत.

Rishi Sunak : सूनक यांनी पत्नीसह भगवान स्वामी नारायणांची केली आरती

ते पुढे म्हणाले, "ऋषी सुनक यांनी आमच्याशी संपर्क साधून मंदिरात दर्शन घेण्यास सांगितले होते. त्यांनी आम्हाला विचारले होते की ते कोणत्या वेळी भेट देऊ शकतात. आम्ही त्यांना केंव्हाही येऊ शकता, असे सांगितले होते. त्यांनी मंदिरात आरती केली, येथील संतांची भेट घेतली, मंदिरातील सर्व मूर्तींना फुलेही वाहिली. त्याच्या पत्नीनेही पूजा केली.

आम्ही त्यांना मंदिराविषयी माहिती दिली आणि भेट म्हणून मंदिराचे एक मॉडेल देखील दिले. त्याने येथे प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटला. त्यांची पत्नी देखील खूप आनंदी होती. ते म्हणाले की मला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन," असे मंदिराच्या संचालकांनी सांगितले आहे.

Britain PM Rishi Sunak & Sudha Murthy do Arati in Bhagwan Swami Narayan
Britain PM Rishi Sunak & Sudha Murthy do Arati in Bhagwan Swami Narayan

Rishi Sunak : सूनक यांच्या भेटीसाठी मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऋषी सूनक यांच्या भेटीपूर्वीच मंदिर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात आधीच बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत आणि जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर तपास केला जात आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भेटीसाठी पुरेशा प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराच्या सभोवतालची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती आणि तेथे अनेक पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते.

Rishi Sunak : जन्माष्टमी साजरी करण्याची संधी मिळाली नाही – सूनक

याआधी शुक्रवारी, सुनक म्हणाले की त्याने हिंदू सण रक्षाबंधन साजरा केला, परंतु कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची संधी मिळाली नाही, म्हणून त्याने मंदिराला भेट देऊन "त्याची भरपाई" करण्याची आशा व्यक्त केली.

"मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे, आणि मी असाच मोठा झालो. मी असाच आहे. आशा आहे की, मी पुढील काही दिवस येथे असताना मंदिराला भेट देऊ शकेन," असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news