Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी पत्नीसह अक्षरधाम मंदिरात घेतले भगवान स्वामी नारायणाचे दर्शन | पुढारी

Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी पत्नीसह अक्षरधाम मंदिरात घेतले भगवान स्वामी नारायणाचे दर्शन

पुढारी ऑनलाइन डेस्क : Rishi Sunak : G20 परिषदेसाठी भारतात आलेले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिराला पोहोचले. त्यांनी येथील परंपरेप्रमाणे भगवान स्वामी नारायण यांचे दर्शन घेतले. G20 साठी भारतात आल्यानंतर ऋषी सूनक यांनी हिंदू असल्याचा गर्व आहे, असे म्हटले होते.

Rishi Sunak : पुरेशी सुरक्षा व्यवस्था

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात आधीच बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत आणि जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर तपास केला जात आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भेटीसाठी पुरेशा प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी भगवान स्वामी नारायण यांचे दर्शन घेऊन भगवान स्वामी नारायण यांची आरती केली.

Rishi Sunak : भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करारावर बोलणी

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे शुक्रवारी (8 सप्टेंबर) दिल्ली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येथे आगमन झाले. शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रानंतर दोन्ही नेत्यांनी ही बैठक घेतली. तत्पूर्वी, कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर सुनक यांनी मोदींना नमस्कार करून अभिवादन केले.

भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करारावर बोलणी करत आहेत, ज्यासाठी 2022 मध्ये चर्चा सुरू झाली. UK-भारत मुक्त व्यापार करार (FTA) साठी वाटाघाटीची 12वी फेरी यावर्षी 8 ते 31 ऑगस्ट दरम्यान झाली. या वर्षी ऑगस्टमध्ये, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि यूकेचे राज्य सचिव केमी बडेनोच यांनी FTA चा आढावा घेतला आणि वाटाघाटी पुढे नेण्याच्या मार्गांवर सहमती दर्शवली. चर्चेची 13वी फेरी सप्टेंबरमध्ये होणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button