Sonam Kapoor : ‘ये हाथ हम को दे दे ठाकुर’, सोनम कपूर का झाली ट्रोल? (video)

Sonam Kapoor
Sonam Kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ( आहूजा ) तिच्या प्रेगन्सीनंतर आणखी सुंदर दिसत आहे. तिचे आऊटफिटदेखील नेहमीच चर्चेत राहतात.  सोनम ( Sonam Kapoor ) बाळाच्या देखभालीसोबतच सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. यासोबत सोनम कपुर मुंबईतील एका कार्यक्रमात स्पॉट झाली. यावेळी तिने जे कपडे परिधान केले हहोते, त्या कपड्यांची चर्चा होत राहिली. तिच्या अनारकली ड्रेस आणि जॅकेटची चर्चा सर्वत्र पसरली आहे. यावेळी नेटकऱ्यांनी 'शोले' चित्रपटातील 'ठाकूर'ची आठवण काढत तिला ट्रोल केले आहे.

अभिनेत्री सोनम कपूर ( Sonam Kapoor )  नुकतेच मुंबईतील कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला अनारकली ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती अधिक सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. ड्रेसवर सिल्व्हर गोटा पट्टी आणि क्रीम कलरच्या अनारकलीसोबत सिल्व्हर एम्ब्रॉयडरी असलेल्या काळ्या रंगाच्या जॅकेटने तिचा लूक कम्पलिट केला. खास करून, यावेळी सोनमने जॅकेट तिच्या दोन्ही शोल्डरवर ठेवले. त्‍यामुळे तिचे हात जॅकेटच्या आतमध्ये दिसले. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. केसांचा अंबाडा, डोळ्यावर काजळ, ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर इअररिंग, मॅचिंग रिंग आणि बांगड्या, हाय हिल्स, हातात अंगठ्या, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. सोनमचा हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'शोले चित्रपटातील ठाकुर आले आहेत!… ओले ओले ओले' तर दुसऱ्या एका युजर्सने 'ये हाथ हम को दे दे ठाकुर', मागून कुणी पाहिलं तर या बिचाऱ्याला हात नाहीत असे वाटत आहे.' यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी शोले चित्रपटातील ठाकूरवरून सोनमला ट्रोल केले. या व्हिडिओला ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

सोनम कपूरने ८ मे २०१८ मध्ये आनंद आहूजाशी लग्न केले. यानंतर २० ऑगस्ट २०२२ रोजी तिने मुलाला जन्म दिला.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news