राज्यसभेतही भाजप ‘शक्तीमान’ ! ३४ वर्षात प्रथमच १०० सदस्य आकडा पार करणारा पहिलाच पक्ष

राज्यसभेतही भाजप ‘शक्तीमान’ ! ३४ वर्षात प्रथमच १०० सदस्य आकडा पार करणारा पहिलाच पक्ष
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेत भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी वाढली आहे, तर काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. राज्यसभेत काँग्रेसच्या पाच जागा कमी झाल्या आहेत. राज्यसभेत पहिल्यांदाच भाजपने १०० पेक्षा अधिक सदस्य संख्येचा आकडा पार केला आहे. राज्यसभेत १९८८ नंतर १०० सदस्यांचा आकडा पार करणारा भारतीय जनता पक्ष पहिलाच पक्ष ठरला आहे. भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या आता १०१ इतकी झाली आहे. (New Delhi)

भाजपने १३ पैकी ४ जागा जिंकत भाजपने हा आकडा पार केला आहे. गुरूवारी राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणूकीसाठी मतदान झाले होते. युनायटेड पीपल्स लिबरल पार्टी या भाजपसोबत आघाडी असलेल्या पक्षाने आसाममधील राज्यसभेची एक जागा जिंकली. भाजपने आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या पूर्वेकडील राज्यांतील जागा जिंकल्या आहेत. भाजपने या क्षेत्रातून वरिष्ठ गृहातील सदस्य संख्या वाढवली आहे. (New Delhi)

राज्यसभेत भाजपने १०० सदस्यांचा आकडा पार करत असतानाच ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीतूनही विरोधी पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आसाममधील दोन आणि त्रिपुरातील एका जागेसाठी गुरूवारी मतदान पार पडले होते. भाजप उमेदवार एस. फांगनोन कोन्याक यांची नागालँडमधील राज्यसभच्या एकमात्र असलेल्या जागेवर बिनविरोध निवड झाली. आसाममध्ये काँग्रेसच्या रिपुन बोरा आणि रानी नारा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २ एप्रिलला संपेल. (New Delhi)

पंजाब विधानसभेच्या निवडणूकीत मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आपने पंजाबमधील राज्यसभेच्या सर्व पाच जागांवर विजय मिळवला आहे. सध्या आपची वरिष्ठ गृहातील सदस्य संख्या आठ इतकी झाली आहे. काँग्रेसने आसाममधील राज्यसभेच्या जागा गमावल्या आहेत. भाजपने आसामच्या जागांवर विजय मिळवला आहे. (New Delhi)

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news