Rahul Kaswan joins Congress : राजस्थानातील भाजप खासदार राहुल कासवान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील चुरू येथील भाजप खासदार राहुल कासवान यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये आज (दि.११) प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा हे यावेळी उपस्थित होते. Rahul Kaswan joins Congress
कासवान यांना भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारले
भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारल्यामुळे कासवान नाराज झाले होते. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी कासवान यांनी भाजप आणि संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की, तुम्हा सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मी सार्वजनिक जीवनात मोठा निर्णय घेणार आहे. राजकीय कारणास्तव मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि खासदार पदाचा राजीनामा देत आहे.
देवेंद्र झाझरिया यांना चुरू मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 2 मार्चरोजी राजस्थानमधील 25 पैकी 15 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह चार केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने चुरू मतदारसंघातून नवा चेहरा म्हणून देवेंद्र झाझरिया यांना उमेदवारी दिली आहे. झाझरिया यांनी पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदक आणि एक वेळा रौप्य पदक जिंकले आहे.
हेही वाचा
- नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नको : काँग्रेसच्या जया ठाकूर यांची सुप्रीम काेर्टात याचिका
- Lok Sabha Election : ममतांच्या 'एकला चलो'वर काँग्रेसची 'तिखट' प्रतिक्रिया, "पंतप्रधान नाराज होण्याची…"
- तामिळनाडू आणि पाँडीचेरीच्या लोकसभा जागावाटपावर काँग्रेस- द्रमुकचा अंतिम निर्णय, ९ जागा काँग्रेसला

