

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पवन कल्याण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका तेलुगू देसम पार्टी युतीने लढविणार आहे, अशी माहिती पक्षाचे खासदार कनकमेडला रवींद्र कुमार यांनी 'एएनआय'शी बोलताना दिली. ( Lok Sabha Elections : BJP, Jana Sena, TDP finalise seat-sharing deal )
आगामी लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, टीडीपी आणि जनसेना यांनी जागावाटपाचा शिक्कामोर्तब झालं आहे. चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि पवन कल्याण यांच्या जनसेनेने जागावाटपाच्या सूत्रावर सहमती दर्शवली आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. ( Lok Sabha Elections : BJP, Jana Sena, TDP finalise seat-sharing deal )
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेचे २५ मतदारसंघत आहेत. तर 175 विधानसभा मतदारसंघ आहेत.लोकसभेच्या एकूण २४ जागांपैकी जनसेना आणि भाजपला जवळपास आठ जागा मिळण्याची शक्यता आहे.आंध्र प्रदेश विधानसभेसाठी दोन्ही पक्षांना अनुक्रमे 28 ते 32 जागा तर उर्वरित जागा टीडीपीला मिळतील, असेही सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, टीडीपीचे ज्येष्ठ नेते किंजरापू अचनायडू यांनी विजयवाडा येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, युतीबाबतची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. टीडीपी, भाजप आणि जनसेनेने एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे."
हेही वाचा :