

कोलकाता : पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालला हादरवून सोडणार्या बिरभूम जळीतकांड प्रकरण तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) सुरु केला आहे. याप्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, हत्या करण्याच्या उदेशानेच जमावाने १० घरांना आग लावल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात म्हटलं आहे. सीबीआयला याप्रकरणी ७ एप्रिलपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे. दरम्यान, आठ जणांना जिवत जाळण्यापूर्वी बेदम मारहाण करुन धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे फॉरेंसिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.
२१ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट येथील तृणमूलच्या उपसरपंचाची राजकीय संघर्षातून हत्या करण्यात आली. यानंतर पसिरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हत्येचे संतप्त पडसाद उमटले. जमावाने १० घरांना लागलेल्या आगीत ८ जणांचा होपरळून मृत्यू झाला. मृतांमध्ये मुलांसह महिलांचाही समावेश होता. सीबीआयने संबंधिताने गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, ७० ते ८० जणांच्या जमावाने १० घरांना आग लावली. घरातील व्यक्तींची हत्या करण्याच्या हेतूनचे जमावाने हे कृत्य केल्याचे 'एफआयआर'मध्ये म्हटले आहे.
सीबीआय तपास पथकाने आज रामपुरहाट येथे घटनास्थळाला भेट दिली. आठ जणांना जिवत जाळण्यापूर्वी बेदम मारहाण झाल्याचे व धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे फॉरेंसिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. जमावाने ८ जणांना बेदम मारहाण केली. सर्वजण बेशुद्ध झाल्यानंतर घरांना बाहेरुन कुलूप लावून आग लावण्यात आल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १० संशयित आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचलं का?