Abdu Rozik : बिग बॉसमधील छोटा अब्दू रोजिक आहे तरी कोण? जाणून घेऊया त्याच्याविषयी

Abdu Rozik
Abdu Rozik
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावर बिग बॉसच्या १६ व्या सीझनला धमाकेदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी १६ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. याच दरम्यान तजाकिस्तान प्रसिद्ध गायक आणि कमी उंचीचा अब्दू रोजिक (Abdu Rozik) ची शोत एन्ट्री झाली. यानंतर त्याने घातलेल्या गोल्डन शूजमुळे तो चर्चेत आला आहे. तर सध्या त्याच्या संपत्तीचा आकडा पाहून सर्वाचे डोळे विस्फारले आहेत.

अब्दू रोजिक (Abdu Rozik) ने सलमान खानचे 'दिल दिवाना' गाणं गात बिग बॉस शोत धमाकेदार एन्ट्री केली. अब्दू हा १९ वर्षांचा असून गायक आणि बॉक्सर असल्याचे त्याने सांगितले आहे. याच दरम्यान शोत त्याने घाललेल्या गोल्डन शूजची किंमत ४० हजार डॉलर (३२ लाख ८६ हजार) असल्याचे सांगितल्याने उपस्थित असणाऱ्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर त्यांचे शूज चोरीला जाण्याची शक्यता असल्याने त्याने ते सूटकेसमध्ये लपवून ठेवले होते.

अब्दू रोजिकचा जन्म ३ सप्टेंबर २००३ साली झाला होता. लहानपणापासून 'रिकेट्स' हा आजार असल्याने त्याची उंची वाढू शकली नाही. परंतु, त्याने या आजारावर मात करून आपल्या कलेच्या जोरावर ओळख निर्माण केली आहे. यासोबतच अब्दू रोजिक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. मेहमी तो आपले फोटो आणि गाण्याचे व्हिडिओ शेअर करत असतो. अब्दूचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोईंग आहे.

अब्दूचे इन्स्टाग्रामवर ३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. परंतु, सर्वात कमी उंचाच्या दिसणाऱ्या या गायकाकडे किती संपत्ती किती आहे हे माहिती आहे का?. सूत्राच्या माहितीनुसार, अब्दू हा २ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. यात बंगला, चारचाकी गाड्या, गोल्डन शूज इ. वस्तू पाहायला मिळतात. अब्दू एका युट्यूब चॅनलचा मालक असून त्याच्या चॅनेलवर ५८२ k पैक्षा अधिक सबस्‍क्रायबर आहेत. याशिवाय तो सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात दिसणार आहे. जगातील सर्वात छोट्या गायकांच्या यादीत अब्दूची गणना केली जाते. यासोबतच विराट कोहली, अनुष्का शर्मा, शाहिद कपूर, शिल्पा शेट्टी याच्यासह अनेक सेलेब्रिटीसोबत त्याला पाहिलं गेलं आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news