

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या घरातून साजिद खानलादेखील बाहेर जावं लागलं. (BB16-Sajid Khan) परंतु, जाण्याआधी त्याने एका सदस्याला सावध करत एका स्पर्धकाविषयी इशारा दिला. घरातील सर्वात चतूर खेळाडू कोण आहे आणि त्याच्यापासून सावध राहण्याचा सल्ला साजिदने घराबाहेर जाण्याआधी दिला. (BB16-Sajid Khan)
मागील एपिसोडमध्ये प्रियांका चहर चौधरी सौंदर्या शर्मासोबत बातचीत करताना दिसली. तिने सौंदर्याला सांगितले की, तिने अंकितला नॉमिनेट केले. या गोष्टीवरून सौंदर्यानेदेखील आपल्या मनातील गोष्ट सांगितली. ती खरंच त्याला आपले मित्र मानायची. एकीकडे प्रियांका-सौंदर्या आपले भांडण संपवत होते. तर दुसरीकडे निमृत दोन्हीकडे बातचीत करत इनसिक्योर दिसली. निमृतने जेव्हा ही गोष्ट सौंदर्याशी सांगितली. तेव्हा तिने आपले स्पष्टीकरण दिले. परंतु, जेव्हा तिने साजिद खानशी या गोष्टीची चर्चा केली तेव्हा दिग्दर्शकांनी त्यांना समजवले. प्रियांका या घरात सर्वात मोठी चतुर खेळाडू असल्याचे साजिद खानने सांगत सावध राहण्याचा इशारा दिला.
साजिद खानने सौंदर्याला समजवत सांगितले की, प्रियंका फॉलोअर्स नाही तर लीडर आहे. ती सर्वांना मार्गदर्शन करते. ती ज्यांना मार्गदर्शन करते, तो या घरातून बाहेर होतो. आधी अंकितनंतर विकास मनकत घराबाहेर गेला. आता टीनादेखील जाईल. साजिद खान सौंदर्याला सावध करत प्रियंकाशी दूर राहण्याचा सल्ला दिला. ती खूप शार्प खेळाडू असल्याचे सांगितले.