

पुणे : रुग्ण म्हणून ससून रुग्णालयात दाखल असतानाही ड्रग्सचे रॅकेट चालविणार्या आणि सध्या फरारी असलेल्या ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील व त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला घेऊन पुणे पोलिसांचे पथक नाशिकमध्ये गेले. तेथे त्यांनी भूषणचा ड्रग्जचा कारखाना, त्याच्या दोन्ही घरांची झाडाझडती घेतली. मुंबई पोलिसांनी नाशिकमधील शिंदे पळसे गावात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता, त्यात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले होते, त्यानंतर या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप ही झाले होते, त्यामुळे दिवसेंदिवस या ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. सर्व धागेदोरे जुळविण्याचेदेखील काम पुणे पोलिसांकडून केले जात आहे.
ललित हा 15 दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडणे पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला असून, रात्रंदिवस पोलिसांकडून तपास केला जात आहे.
तपासात गोपनीयता
पुणे पोलिस पथकाने शिंदे गावात तपास करीत असताना गोपनीय पद्धतीने आवश्यक असलेली माहिती संकलित केली. माध्यमांसोबत बोलण्यास पोलिसांनी स्पष्टपणे नकार दिला. पथकातील तपास अधिकार्यांच्या नावांविषयीदेखील कमालीची गोपनीयता पाळण्यात आली.
हेही वाचा :