

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंग बॉलीवूड स्टार भूमी पेडणेकर ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी प्रोजेक्टच्या शोधात आहे. आपल्या अभिनयाच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच भूमी पेडणेकरने विविध भूमिकांमधून हिंदी सिनेमा जगतात एक वेगली ओळख बनवलीय. मागील भूमीच्या चार चित्रपट "भीड", "अफवाह", "थँक यू फॉर कॉलिंग" आणि "लेडी किलर" रिलीज झाले आहेत. दोन चित्रपट "भक्त" आणि "मेरी पत्नी का रीमेक" बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. पण, भूमी पेडणेकरचे लक्ष ओटीटीवर आहे.
संबंधित बातम्या –
ती म्हणते, "जागतिक स्तरावर तसेच भारतात स्ट्रीमिंग कंटेंट चा बार अविश्वसनीय आहे. मी आता काही काळापासून डिजिटल स्पेसमध्ये जाण्याचा विचार करत आहे, परंतु मी स्पष्ट आहे की, स्ट्रीमिंगवर माझे पदार्पण काहीतरी रोमांचक आणि मी करत असलेल्या सर्व अविश्वसनीय चित्रपटांपेक्षा वेगळे असले पाहिजे."
भूमी रेड चिलीजच्या 'भक्षक' आणि मुदस्सर अजीजच्या 'मेरे हसबंड की बीवी'मध्ये दिसणार आहे.